संबंध, संपर्क, संघटन यातून जनसेवा घडते – खासदार गिरीश बापट

पुणे, दि. 31 – सामान्य माणसाला आनंदी ठेवण्यासाठी त्याच्याशी चांगले संबंध ठेवणे आवश्यक आहे. संपर्क ठेवल्याने चांगले संबंध प्रस्थापित होतात. संबंध आणि संपर्कातून चांगले संघटन निर्माण होते. या संघटनेतून जनसेवा होते. राजकीय जीवनात या चतुश्रुतीला महत्व आहे. असे मत खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केले. भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने यांच्या औंध- बोपोडी जनसंपर्क कार्यालयचे उद्घाटन खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाला आमदार सिद्धार्थ शिरोळे, महापौर मुरलीधर मोहोळ, शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, भाजप संघटन सरचिटणीस राजेश पांडे, नगरसेवक प्रकाश ढोरे , सम्राट थोरात किरण दगडे पाटील, राजेश येनपुरे, दीपक पोटे, अमोल बालवडकर, गायत्री खडके,बाबू नायर, महेश पुंडे, खडकी कॅन्टोन्मेट बोर्डाच्या उपाध्यक्षा कार्तिकी हिवरकर, भाजपा युवा अध्यक्ष बापू मानकर , कसबा विधानसभा मतदार संघ अध्यक्ष अध्यक्ष प्रमोद कोंढरे, कोथरूड विधानसभा मतदार संघ अध्यक्ष पुनीत जोशी,किरण गिरमकर , अतुल गायकवाड, शिवसेनेचे चंद्रशेखर जावळे, आरपीआयचे असित गांगुर्डे , आरपीआय मुस्लिम आघाडी अध्यक्ष राफीक अहमद ,सुरेश शेवाळे, डॉ.अंबरीश दरक,भावना शेळके  यांच्या सह मान्यवर उपस्थित होते.  

यावेळी सुनील माने यांच्या कडून अयोध्येतील राम मंदिर निर्माणासाठी एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.

सामाजिक व राजकीय जीवनात काम करत असताना जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून लोकांची अर्ध्याहून कामे होतात. लोक दु:खी होऊन संपर्क कार्यालयात येतात मात्र संपर्क कार्यालयातून परत जाताना आनंदी होऊन गेली पाहिजेत. माणस जोडणे हा सुनील माने यांचा स्वभाव आहे. लोकांची सेवा करणे हा केंद्रबिंदू धरून ते गेली अनेक वर्ष काम करत आहेत. प्रत्यक्ष राजकारणात जरी त्यांनी आता प्रवेश केला असला तरी पडद्यामागे राहून ते सातत्याने जनसेवा करत आले आहेत. असे ही खासदार गिरीश बापट म्हणाले.

आमदार सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, सुनील माने हे पूर्वाश्रमीचे पत्रकार होते त्यामुळे त्यांना सामाजिक प्रश्नाची उत्तम जाण आहे. त्याचप्रमाणे प्रशासकीय कामाकाजाची ही सर्वांगीण माहिती त्यांना आहे. त्यांच्या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून औंध बोपोडी भागात सर्वसामान्यांची व पक्षाची कामे लवकरात लवकर मार्गी लागतील असा विश्वास आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सुनील माने यांच्या रूपाने भारतीय जनता पक्षाला राजकीय परिपक्व कार्यकर्ता मिळाला असल्याचे मत व्यक्त केले.  

सुनील माने यांनी माझ्या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून लक्ष्य अंत्योदय ठेऊन काम करणार असल्याचे सांगितले. संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून राज्य आणि केंद्र शासनाच्या योजना सामान्य जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: