चित्रपटगृह 100 टक्के क्षमतेने सुरु करण्यास परवानगी

नवी दिल्ली – केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने चित्रपटगृह 100 टक्के क्षमतेसह उघडण्याची परवानगी दिली आहे. यानुसार देशातील सर्वच चित्रपटगृहे 1 फेब्रुवारीपासून 100 टक्के क्षमतेने सुरू होतील.

चित्रपटगृह 100 टक्के क्षमतेसह उघडण्यासाठी बऱ्याच नियम आणि अटी घालून दिल्या आहेत. याचे पालन चित्रपटगृह व्यवस्थापनाला करावे लागणार आहे.

नियमावली पुढीलप्रमाणे

चित्रपटगृहामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये कमीतकमी 6 फूट अंतर राखणे बंधनकारक असेल.

चित्रपटगृहांमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मास्क बंधनकारक आहे.

चित्रपटगृहांमध्ये प्रवेश करताना आणि बाहेर पडताना दोन्ही ठिकाणी सॅनिटायझर ठेवणे बंधनकारक आहे.

चित्रपटगृहांच्या परिसरात थुंकण्यास कडक निषिद्ध

Leave a Reply

%d bloggers like this: