‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्त विद्यार्थ्यांद्वारे कविता सादरीकरण

पुणे, दि. ३१ – एम. सी. ई. सोसायटीच्या एम. ए. रंगूनवाला इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड रिसर्च मध्ये ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ दिनानिमित्त विद्यार्थ्यांद्वारे कविता सादरीकरण कार्यक्रमाचे आयोजन गुगल मिट या माध्यमाद्वारे करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना व ग्रंथालय यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.
मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त व्हावा आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी पुनीत बसन व ग्रंथपाल चंदा सुपेकर यांनी प्राचार्या डॉ. अनिता फ्रांन्झ यांच्या मार्गदर्शनाखाली या सत्राचे आयोजन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: