डॉ. विनिता आपटे यांना आंतरराष्ट्रीयस्तरावरील ‘महात्मा पुरस्कार’

पुणे, दि. ३१ – जगभरात जे वैयक्तिक स्तरावर तसेच ज्या संस्था समाजासाठी महत्वपूर्ण व भरीव कामगिरी करतात त्यांच्या कामाची जागतिकस्तरावर ओळख व्हावी म्हणून महात्मा पुरस्कार समितीद्वारा हा आंतरराष्ट्रीय पातळीवरील ‘महात्मा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. पुण्यातील पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व त्यासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या ‘तेर’ पॉलिसी सेंटर या पर्यावरणासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. विनिता आपटे यांना ‘महात्मा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

महात्मा पुरस्कार सामाजिक उद्योजक आणि समाजसेवक अमित सचदेव यांनी स्थापित केले आहेत. त्यांना भारतातील कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) विधेयकासाठी भारतीय सीएसआर माणूस म्हणून ओळखले जाते. लाइव्हवीक ग्रुपतर्फे हा पुरस्कार देण्यात आला आहे. जीन्दल स्टील फाउंडेशनच्या अध्यक्ष शैलू जीन्दल यांच्या हस्ते पुरस्कार वितरण दिल्ली येथे झाले. यावेळी  न्यू यॉर्क येथील लाइव्हवीक फाउंडेशनचे संचालक अमित सचदेव यांची प्रमुख उपस्थिती होती. महात्मा पुरस्कार हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार असुन सामाजिक परिणाम घडावा ‘सोशल इम्पैक्ट’ साठी दिला जातो.

तेर पॉलीसी सेंटर हवामान बदल, पर्यावरण या क्षेत्रात काम करणारी पुण्यातील अग्रगण्य संस्था आहे. या संस्थेद्वारा गेल्या काही वर्षात पुण्यासह महाराष्ट्रात हजारो वृक्ष लावुन त्याची जोपासना केली जात आहे. संस्थेने पर्यावरण जागरुकते साठी  राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांसाठी अॉलम्पियाड (olympiyad) सुरु केली असून दर वर्षी लाखो विद्यार्थी यात सहभागी होत असतात. ग्रामीण भागात विहिरिंचे पुनरुज्जीवन, सौर उर्जेचा वापर यामुळे ग्रामीण महिलांचे कष्ट कमी करुन त्यांचे सबलीकरण करण्यात मह्त्वाचा वाटा यांनी उचलला आहे.राष्ट्रीय व अंतर राष्ट्रीय स्तरावर हवामान बदलासाठी उपयुक्त गोष्टी केल्या बद्दल डॉ. आपटे यांना महात्मा पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

“महात्मा गांधींच्या नावाने मिळालेल्या पुरस्कारामुळे काम करण्याची आणखी उर्जा मिळाली असली तरी जबाबदारी पण जास्त वाढली आहे. हा पुरस्कार मला जरी मिळाला असला तरी ते यश खरतर माझ्या सहकाऱ्यांचे आहे . ‘तेर’ मध्ये काम करणारी तरुण मुलं अत्यंत तळमळीने काम करतात त्याचमुळे हा पुरस्कार मिळाला,” अशा शब्दात डॉ विनिता आपटे यांनी सत्काराला उत्तर दिले.

Leave a Reply

%d bloggers like this: