दैवज्ञ ब्राह्मण समाजाचा वार्षिक स्नेहमेळावा उत्साहात


पुणे – दैवज्ञ  ब्राम्हण समाजाच्या वतीने नारायण पेठेतील गुप्ते मंगल कार्यालय येथे वार्षिक स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.  

डॉ. सचिन वेर्णेकर, दिलीप रेवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात पार पडला. 
स्नेहमेळाव्यात विविध कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते. मागील वर्षाच्या संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला. तसेच नवीन संचालक मंडळाने पदभार स्विकारला. लहान मुलांच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धा देखील यावेळी घेण्यात आल्या. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान देखील करण्यात आला. 
कोविडमुळे वर्षभर नियोजित कार्यक्रम झाले नाहीत, त्यामुळे नव्या जोमाने विविध सामाजिक कार्यक्रम राबवू असे संचालक मंडळाच्या वतीने सांगण्यात आले. 

Leave a Reply

%d bloggers like this: