छत्रपती शिवाजी महाराज मूळचे कन्नड भूमीतले, कर्नाटकच्या मंत्र्याचा अजब दावा

मुंबई, दि. 31 –  छत्रपती शिवाजी महाराज मूळचे कन्नड भूमीमधलेच आहेत, असं अजब वक्तव्य कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री गोविंद कार्जोळ यांनी केलंय. छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्वज कर्नाटकातले असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केलाय. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इतिहास माहीत नाही, त्यांनी तो वाचला ही नाही, असं कार्जोळ यांनी म्हटलंय. शिवाजी महाराजांचे पूर्वज गदग जिल्ह्यातल्या सोरटूर गावाचे असल्याचा दावा त्यांनी केला. 

कर्नाटकात दुष्काळ पडल्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्वज महाराष्ट्रात गेल्याचा जावईशोध कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी लावलाय. 

दरम्यान कर्नाटकचे उपमुख्यमंत्री बालिश आहेत, अशी प्रतिक्रिया उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिलीय. 

तसेच कर्नाटकमधील भाजपचे नेते जे वक्तव्य करत आहेत ते चुकीचे आहे. आम्ही त्याचा निषेध करतो, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कर्नाटकातील भाजप नेत्यांवर टीका करत घरचा आहेर दिला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: