हापूसच्या आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डिंग, मार्केटिंग साठी  माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची भेट 

पुणे – कोकणच्या हापूस चे आंतरराष्ट्रीय पातळीवर ब्रॅण्डिंग आणि मार्केटिंग करण्यासाठी कोकण भूमी प्रतिष्ठान चे संस्थापक संजय यादवराव यांनी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन चर्चा केली. शेतकऱ्यांची बाजारपेठ निर्माण करणे,जागतिक पातळीवर विशेषतः युरोप -अमेरिकेत  विपणन करणे यासाठी सुरेश प्रभू यांनी मार्गदर्शन केले. कोकणामधील महामार्गाचे चौपदरीकरण ,पर्यटन विकास यावरही या बैठकीत चर्चा झाली. राज्याचे माजी मुख्य सचिव द म सुखठणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण महामार्ग समितीने केलेल्या सर्वेक्षणातून तयार करण्यात आलेला अहवाल सुरेश प्रभू यांना सादर करण्यात आला.

Leave a Reply

%d bloggers like this: