दिल्लीतील इस्रायली दुतावासाबाहेर बॉम्बस्फोट

नवी दिल्ली – दिल्लीतील अब्दुल कलाम मार्गावर शुक्रवारी सायंकाळी भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे पाच गाड्यांचे नुकसान झाले आहे. अद्याप कोणत्याही जीवितहानीची माहिती नाही. हा स्फोट कमी तीव्रतेचा असला तरी सध्या दिल्लीतील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या घटनेला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे दिल्लीतील सर्व सुरक्षायंत्रणा कमालीच्या सतर्क झाल्या आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, हा स्फोट नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अब्दुल कलाम मार्ग हा व्हीव्हीआयपी परिसर आहे. याठिकाणी अनेक देशांचे दुतावास आहेत. इस्रायली दुतावासाबाहेर हा स्फोट झाल्याचे सांगितले जाते. सध्या पोलीस आणि सुरक्षायंत्रणा अब्दुल कलाम मार्गावर दाखल झाल्या असून तपासाला सुरुवात झाली आहे. या परिसराला सध्या पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.

या स्फोटाचा आवाज दूरपर्यंत ऐकायला आला. या स्फोटामुळे उभ्या असलेल्या काही गाड्यांच्या काचा फुटल्या. सुदैवाने यामध्ये कुणीही जखमी झालेलं नाही. हा परिसर VVIP असल्यामुळे इथली सुरक्षा व्यवस्था कडक असते. या स्फोटानंतर संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. कमी तीव्रतेचा हा स्फोट आहे. संध्याकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी हा स्फोट झाल्याचं सांगण्यात येत आहे. या स्फोटात कुणालाही दुखापत झालेली नाही, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.

Leave a Reply

%d bloggers like this: