अण्णासाहेब मगर महाविद्यालय येथे रस्ता सुरक्षा जनजागृती

पुणे – राज्यात सध्या परिवहन विभागाच्या वतीने 17 जानेवारी ते 17 फेब्रुवारी 2021 असा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना साजरा करण्यात येत आहे. यापूर्वी पंधरवाडा साजरा केला जात असे, या उपक्रमांतर्गत अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर येथे विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षा, वाहतूक नियम याबद्दल जागृती करण्यात आली.

प्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पंतोजी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या जनजागृती उपक्रमाला मोटार वाहन किरण बनसोडे, महेश ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक महेश शिळीमकर, भारत सुझूकीचे जॉन दास, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडितराव शेळके, उपप्राचार्य के. टी. थोरात, प्रा. सागर तांबडे, प्रा. सारिका भुजबळ, प्रा. युवराज कांबळे, प्रा. सुवर्णा बराते आदी मान्यवर उपस्थित होते. या जनजागृती उपक्रमात महाविद्यालयातील 12 वी चे सर्व विध्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संजीव पवार यांनी केले. प्रा. अनिल देवकते यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: