सरकारचा आडमुठेपणा, किसान बाग आंदोलनाला परवानगी नाकारली, वंचित कुठल्याही परिस्थितीत आंदोलन करणार

मुंबई, दि. २६ – केंद्र सरकारने पारित केलेले कृषी विधेयक बिल रद्द करण्यात यावे, यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीत लाखो शेतकरी आंदोलन करीत आहेत. मात्र केंद्र सरकार कुठल्याही परिस्थितीत हे बिल रद्द करण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसून येत आहे. आज दिल्ली तसेच आसपासच्या परिसरात शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने राज्यभर किसान बाग आंदोलन करण्यात येणार आहे. मात्र मुंबईतील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली. मात्र हे आंदोलन शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी असल्याने कुठल्याही परिस्थितीत आंदोलन करण्याचा निश्चय वंचित बहुजन आघाडीने केला असून मुंबई आंदोलन संपन्न झाले त्या नागपाडा, आरबिया हॉटेल जवळ उद्या वंचित बहुजन आघाडीचे हजारो कार्यकर्ते व मुस्लिम बांधव एकत्र येऊन हे आंदोलन यशस्वी करणार आहेत.

दिल्लीतील शाईन बाग आंदोलना सारखे राज्यात किसान बाग आंदोलन करण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी घेतला. या आंदोलनासाठी अनेक मुस्लिम संघटनांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला आहे. राज्यभर हे आंदोलन होणार असून शाईन बागच्या धर्तीवर किसान बाग असे आंदोलनाचे स्वरूप असेल. राज्यभरातील लाखो मुस्लीम बांधव या आंदोलनात उतरणार असल्याने मुंबईत ठिकठिकाणी आंदोलन होणार असून या आंदोलनाची पूर्व परवानगी पोलिसांकडे मागण्यात आली होती. मात्र ऐनवेळी पोलिसांनी परवानगी नाकारल्याने पोलिसांना हे आंदोलन होऊन द्यायचे नसल्याचे दिसून येते. केंद्रात बीजेपी सरकारने ज्याप्रकारे हे आंदोलन संपवण्याचा घाट घातला आहे. तसाच प्रकारे हे आघाडी सरकार शेतकऱ्यांना पाठिंबा देण्याऐवजी शेतकऱ्यांचे हे आंदोलन संपवण्याचा डाव रचत आहे. मात्र वंचित बहुजन आघाडी कुठल्याही परिस्थितीत किसान बाग आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. नागपाडा,आरबिया हॉटेल या ठिकाणी उद्या सकाळपासूनच वंचित बहुजन आघाडीचे हजारो कार्यकर्ते व मुस्लिम बांधव एकत्र येऊन हे आंदोलन यशस्वी करणार असल्याचे वंचित बहुजन आघाडी तर्फे सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: