एटेनएक्स स्पोर्ट्स यांच्या वतीने आयोजित पुणे ते महाबळेश्वर रिले ला सुरुवात…!!
पुणे, दि. २६ – कोणत्याही परिस्थितीवर मात करण्यासाठी मानसिक कणखरता ही महत्त्वाची असते. आपली मानसिक क्षमता वाढविण्याच्या दृष्टीकोनातून ‘एटेनएक्स स्पोर्ट्स’ यांच्या वतीने पुणे ते महाबळेश्वर रिलेचे आयोजन करण्यात आले आहे.
या रिले मध्ये ट्रायअथलीट वर्धन बोरगावे, आदित्य गणेशवाडे, साकेत गणेशवाडे, तेज खाडिलकर, शंकर राऊत, करण अंतुरकर, राज जोशी, डॉ.चिन्मय चोपडे हे पुणे ते महाबळेश्वर असे सुमारे १२६ किमी अंतर धावणार आहेत.
गणतंत्रदिनाच्या निमित्ताने झेंड्याला सलामी देवून पहाटे ४ वाजता वारजे भागातून या रिलेला सुरुवात झाली. धावपटू आता पुणे सातारा महामार्गावरील खंबाटकी घाट पार करून पुढे गेले आहेत…!!