‘सीडीके ग्लोबल कन्व्हर्जन्स 2021’ : यश व एकत्रितपणा साजरा करण्यासाठी

हैदराबाद – ‘सीडीके ग्लोबल इंडिया’ – सीडीके ग्लोबल या एकात्मिक माहिती तंत्रज्ञान सोल्यूशन पुरविणाऱ्या आघाडीच्या जागतिक कंपनीने, ‘सीडीके ग्लोबल कन्व्हर्जन्स 2021’ या आपल्या सहाव्या वार्षिक कौटुंबिक दिन कार्यक्रमात आपल्या कर्मचाऱ्यांचे कोविड साथीच्या काळात दिलेल्या योगदानाबद्दल कौतुक केले.

यावर्षी, ‘द हाऊस फॅमिली पार्टी’ च्या अनोख्या संकल्पनेसह सादर झालेले हे पहिलेच व्हर्च्युअल संमेलन होते. यामध्ये कंपनीचे विद्यमान कर्मचारी, त्यांचे कुटुंबिय उपस्थित होतेच; त्याशिवाय, कोविड साथीच्या काळात या कर्मचाऱ्यांनी केलेल्या यशस्वी कामगिरीचे कौतुक करण्यासाठी व हे यश एकत्रित साजरे करण्यासाठी कंपनीचे माजी कर्मचारीदेखील उपस्थित होते. हा कार्यक्रम एका अभिनव टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्मवर प्रसारीत करण्यात आला. यातील एका सुंदर व्हर्च्युअल रंगमंचावरून भारतातील विविध शहरांमध्ये असलेल्या प्रेक्षकांना एक अनोखा अनुभव मिळाला. या ‘ऑनलाईन इव्हेंट प्लॅटफॉर्म’मध्ये ‘गेम्स कॅसल’, ‘डॉ. फनस्टॉर्म’, ‘लाइव्ह मॅजिक’ आणि ‘अ‍ॅस्ट्रो स्पीक’ असे मनोरंजक खेळ होते. त्याचप्रमाणे, जुन्या काळातील व्हिडिओ, सुप्रसिद्ध व दिग्गज कलावंतांचे कार्यक्रम, कौशल्य प्रदर्शन हेही सादर करण्यात आले. कंपनीची समाजाप्रति कटिबद्धता आणि सर्वसमावेशकता व विविधता यांचे सीडीके स्टॉल्सवरून सादरीकरणही त्यावरून करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रमुख मंचावरून ‘माय फ्रेड गणेशा’ यांसह चित्रम्मा शो, बॉलिवूडच्या कलावंतांची नक्कल, प्रेक्षकांचा थेट सहभाग असलेला ‘पांच का पंच’ असे कार्यक्रम सादर झाले. या सर्व कार्यक्रमांमुळे कार्यक्रमाची रंगत वाढली. पुणे व हैदराबादमधील ‘स्नेहायल’ व ‘चेरिश फाऊंडेशन’ येथील विशेष मुले या कार्यक्रमास उपस्थित होती. त्यांनीही काही अचंबित करणारे कार्यक्रम सादर केले.

व्हर्च्युअल स्टेजच्या कार्यक्रमाचा प्रारंभ एका कौटुंबिक ‘मॉन्टेज व्हिडिओ’सह झाला. या व्हिडिओमधून न्यू-नॉर्मल परिस्थितीशी सामना करण्याची व एकत्रितपणाची भावना अखंड राखण्यासाठी उत्साह आणि सर्जनशीलता दर्शविण्यात आली. ‘शेप ऑफ यू’, ‘हुस्न है सुहाना’, ‘गल्लन गुडियॉं’, ‘झेडएनएमडी’ या चित्रपटातील ‘सिनोरिटा’ यांसारख्या हिट गाण्यांवर कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांनी ताल धरला. बसंती रिटर्न्स आणि लाईव्ह डीजे या कार्यक्रमांनी हा सोहळा हास्यकल्लोळात पार पडला. ‘सीडीके अनप्लग्ड’ हा सीडीके ग्लोबलचा (इंडिया) स्वतःचा बँड आहे. या बॅंडने शो-स्टॉपर नेत्यांसह उपस्थितांच्या मागणीनुसार कार्यक्रम सादर केले. त्यातून सोहळ्याची रंगत अधिकच वाढली. फॅमिली हाऊस पार्टीच्या अनुभवाची लज्जत वाढविण्याकरीता, कंपनीने कर्मचाऱ्यांना विशेष भेटवस्तू दिल्या, तसेच कर्मचाऱ्यांना शनिवारची सायंकाळ कुटुंबियांसमवेत एकत्रित साजरी करता यावी, यासाठी त्यांच्या घरी ‘फूड कूपन्स’ पाठवून दिली.

‘सीडीके ग्लोबल इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक अरविंद चतुर्वेदी यांनी कार्यक्रमाच्या वेळी कुटुंबातील सदस्यांना संबोधित करताना सांगितले, “2020 या कोविडने ग्रासलेल्या वर्षात आपणा सर्वांपुढे अनेक आव्हाने उभी राहिली व आपल्या टीम-स्पिरीटची कधी नव्हे ती चाचणी झाली. मला सांगायला अभिमान वाटतो, की या प्रतिकूल परिस्थितीतही, आपल्या कर्मचारीवर्गाने उत्कृष्ट कामगिरी केली व चांगले परिणाम दर्शविले. आमचा कर्मचारीवर्ग आणि भागधारक यांनी दाखवलेला उत्साह व दृढनिश्चय हा संपूर्ण ‘सीडीके ग्लोबल फॅमिली’साठी एक आशीर्वाद आहे. आम्ही आमच्या कुटुंबातील सदस्यांबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. या सर्वांनी आमच्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे मनोबल उंच ठेवले, त्यांना निरंतर आधार दिला, आम्हाला उत्कृष्ट कामगिरी करण्यात मदत केली व सदासर्वकाळ आमच्या कल्याणासाठी आमची काळजी घेतली. ‘सीडीके ग्लोबल फॅमिली’ पूर्वीपेक्षा अधिक सामर्थ्यवान आहे. ती पुढे एकत्रपणे वाढतच जाईल आणि सन 2021 मध्ये अधिक उंची गाठेल.”

या कार्यक्रमादरम्यान, ‘द्रोणाचार्य’, ‘यू मेक ए डिफरन्स’, ‘स्पार्क’ आणि ‘सायलंट स्टार’ अशी पारितोषिके देऊन कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाबद्दल व योगदानाबद्दल गौरविण्यात आले. ‘सीडीके ग्लोबल कन्व्हर्जन्स 2021’ हा एक विशेष कार्यक्रम आहे; कारण सन 2020 हे वर्ष अनन्य आव्हानांनी भरलेले होते. न्यू-नॉर्मल व इतर अनेक स्वरुपाच्या संधी या वर्षात निर्माण झाल्या; तथापि, हेही सत्य आहे की, या काळात ‘सीडीके फॅमिली’ पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आणि एकत्रितपणे वाढत गेली. सन 2020 मध्ये ‘ग्रेट प्लेस टू वर्क’ म्हणून आम्हाला मान्यता मिळाली. यातून आमची मूळ मूल्ये आणि संस्कृती सिद्ध झाली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: