नवोदित कलाकारांना मार्गदर्शनासाठी ‘रंगकर्मी चोरडिया फाउंडेशन’

अध्यक्षपदी संतोष चोरडिया तर ऊपाध्यक्ष पदी डाँ .अभिजीत बोरा यांची निवड

पुणे –  आपल्या ललितकला म्हणजेच भारतीय संगीत, नाटक , लोककला ,अभिजात नृत्य या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या नवोदित कलाकारांना प्रोत्साहन आणि व्यासपीठ उपलब्ध करून या कलांच्या प्रसारासाठी ‘ रंगकर्मी चोरडिया फाउंडेशन ‘ स्थापन करण्यात आले आहे.           

 सुप्रसिद्ध सिनेअभिनेता आणि एकपात्री कलाकार संतोष चोरडिया यांची संस्थापक, अध्यक्ष म्हणून तर उपाध्यक्षपदी डाँ .अभिजीत बोरा, सचिव अजिंक्य चोरडिया , खजिनदार  अपूर्वा चोरडिया तर कार्यकारी विश्वस्त म्हणून रंजना चोरडिया , ओंकार चोरडिया , सागर फुलफगर यांची निवड करण्यात आली आहे.  महाराष्ट्र आणि संपूर्ण भारत असे या फाउंडेशनचे कार्यक्षेत्र राहणार असून माझ्या गेल्या ३५ वर्षांचा रंगभूमी , चित्रपट, नाट्य या क्षेत्रातील अनुभव नवीन पिढीला देण्याचे प्रमुख ध्येय असल्याचे संतोष चोरडिया यांनी कळविले आहे. 

Leave a Reply

%d bloggers like this: