आय एम ए पुणे तर्फे वैद्यकीय परिषद मल्टीकॉन 2020-2021चे आयोजन

पुणे, दि. 23 – आय एम ए पुणे तर्फे तिसावी वार्षिक वैद्यकीय परिषद शनिवार दिनांक १६ जानेवारी व १७ जानेवारी रोजी,  इतिहासात प्रथमच ३ डी प्लॅटफॉर्म माध्यमातून डॉ. आरती निमकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या अंतर्गत रविवार १० जानेवारी शल्यचिकित्सा  व वंध्यत्व निवारण या विषयांवर कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या होत्या.                

यामध्ये विविध शाखेच्या अलोपॅथी वैद्यकीय तज्ञांचे ७०० हून अधिक अलोपॅथी डॉक्टरांना मार्गदर्शन मिळाले. कोव्हीडच्या नियमांचे काटेकोर पालन करत घरी बसून लॅपटॉप / मोबाईल च्या साहाय्याने परिषदेमध्ये वैद्यकीय माहितीची देवाणघेवाण झाली.  या निमित्ताने लेफ्ट. जन. डॉ. माधुरी कानिटकर मुख्य अतिथी तर डॉ. रामकृष्ण लोंढे, आय एम ए महाराष्ट्र अध्यक्ष आदरणीय अतिथी म्हणून लाभले.  

टाटा मेमोरियल, मुंबईचे डायरेक्टर डॉ. राजेंद्र बडवे यांना यांना आय एम ए भूषण पुरस्कार (डॉ. एम जे  जोशी यांच्या स्मरणार्थ), देण्यात आला डॉ. संदीप साळवी प्रख्यात फुप्फुस रोग तज्ञ यांना राट्रीय नेत्ररोग संस्थेतर्फे, डॉ. चंद्रशेखर पोंडे. ह्दयविकारतज्ञ् मुंबई यांना कै. नितू मांडके यांच्या स्मरणार्थ पुणेरी पगडी, शाल, पुष्पगुच्छ व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

या परिषदेसाठी डॉ. आरती निमकर अध्यक्षा, डॉ. बी. एल देशमुख व डॉ. मीनाक्षी देशपांडे उपाध्यक्ष डॉ. राजन संचेती आणि डॉ. सुनील इंगळे सचिव तर डॉ राजू वरायानी वैज्ञानिक समिती अध्यक्ष होते. डॉ. अविनाश भूतकर डॉ. जयंत नवरंगे, डॉ. दिलीप सारडा, डॉ. संजय पाटील आणि डॉ पद्मा अय्यर ह्यांचे मार्गदर्शन लाभले.     

Leave a Reply

%d bloggers like this: