हुंडई कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कडून नवीन एक्सकैवेटर लॉन्च

पुणे – हुंडई कन्स्ट्रक्शन इक्विपमेंटने भारतात व निर्यात बाजारात ब्रँडची स्थिती बळकट करण्यासाठी स्मार्ट प्लस आणि न्यु ग्लोबल कलर या नावाने उत्खनन करणार्‍यां एक्सकैवेटरचे अनावारण केले आहे. यावेळी बांधकाम, खाणकाम, पाटबंधारे आणि पायाभूत सुविधा क्षेत्राची पूर्तता करण्यासाठी 8-टन ते 50-टन वर्गातील एकूण 11 एक्सकैवेटर मॉडेल्स लाँच केली गेली. या कार्यक्रमादरम्यान रॉक ब्रेकर, क्लेशेल बकेट, क्विक कपलर असे विशेष संलग्नक या आनावरण सोहळ्याच्या वेळी दर्शविले गेले, कंपनीचे अधिकृत डीलर्स, ग्राहक आणि मुख्य वित्तपुरवठा करणारे भागीदार यावेळी उपस्थित होते.

कारखान्याच्या आवारात मोकळ्या जागेत आयोजित केलेल्या कार्यक्रमा दरम्यान स्थानिक व केंद्र सरकारच्या कोविड प्रोटोकॉल व मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण करण्यात आले. जे. एस. पार्क , व्यवस्थापकीय संचालक, हुंडाई सीई इंडियाने स्मार्ट प्लस सिरिज आणि नवीन रंगाच्या हुंडाई एक्सकैवेटरचे अनावरण केले. ते म्हणाले, “हुंडाई स्मार्ट प्लस सीरिज नाविन्यपूर्ण सोल्यूशनसह हुंडाई इंडियाची बाजारपेठेत सेवा प्रदाण करण्याची प्रतिबद्धता दर्शवते. ही उत्पादने- इंधन कार्यक्षमता, उच्च उत्पादन क्षमता, संरचना टिकाऊपणा आणि वर्धित ऑपरेटरची सोय यासाठी विकसित केली गेली आहेत. नवीन रंगसंगती हुंडाई एक्सकैवेटरला अधिक दृढ स्वरूप देते आणि ही ग्लोबल कलर स्कीमशी जोडलेली आहे ” ग्लोबल कलर स्मार्ट सिरीज एक्सकैवेटर नेत्रदीपक आहे. प्रत्येक मशीनवर काम करणार्‍या तज्ज्ञ संघाद्वारे नवीनतम वैशिष्ट्ये आणि फायदे समजावून घेता येतील.

कार्यक्रमा नंतर ग्राहकांनां चावी सोपविण्यात आली, मशीन लॉन्च अपग्रेडेड सीरिज आणि ग्लोबल कलर स्कीम- स्मार्ट प्लस सीरिज: आर २१०, आर २१५, आर २१५ एल, आर२३० एलएम, आर २४५ एलआर ग्लोबल कलर स्कीम- आर ८५ ए स्मार्ट, आर१३० स्मार्ट, आर१४० एलसी -९, आर ३४० एल, एचएक्स ३६०, आर ४८० एलसी- ९ एस राजीव चतुर्वेदी, व्हाईस प्रेसिडेंट सेल्स, मार्केटिंग आफ्टर सर्व्हीस एण्ड पार्ट्स म्हणाले, “डीलरशिपच्या मजबूत नेटवर्कसह सुपीरियर क्वालिटी उत्पादनाची जोडणी आसणार्या हुंडाईला बांधकाम, पायाभूत सुविधा आणि खाण क्षेत्रातील ग्राहक निश्चीतच पसंती देतील”.

Leave a Reply

%d bloggers like this: