Wednesday, June 17, 2026
PUNE

लायन्स क्लब अंतर्गत आठ नवीन लिओ क्लबचे उद्घाट

पुणे : लायन्स क्लब डिस्ट्रीक्ट ३२३४D2 च्या रिजन गंगा आणि त्या अंतर्गत येणाºया ८ नवीन लिओ क्लबचे उद्घाटन करण्यात आले.  रिजन चेअरपर्सन रवींद्र गोलर यांच्या अध्यक्षतेखाली राज मुछाल यांनी सर्व क्लबची स्थापना केली. डीजी अभय शास्त्री यांनी क्लबचे उद्घाटन केले. या क्लबच्या माध्यमातून तब्बल ४०० युवक -युवती एकत्र आले असूून विविध समाजोपयोगी कार्यासाठी तरुणाई पुढाकार घेणार आहे. 

लायन्स क्लब डिस्ट्रीक्ट ३२३४D2 च्या वतीने कर्वे  रस्त्यावरील अश्वमेध हॉल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लायन्स क्लबचे पदाधिकारी आणि लिओ क्लबचे सदस्य उपस्थित होते. लिओ क्लब आॅफ फ्युचर स्टार्स, लिओ क्लब आॅफ पूना कोथरुड, लिओ क्लब आॅफ पुणे आकांक्षा, लिओ क्लब आॅफ कथाप्ले, लिओ क्लब आॅफ अग्रसेन लिटल चॅम्प, लिओ क्लब आॅफ अग्रसेन या लिओ क्लबचे यावेळी उद्धाटन करण्यात आले. 

रिजन चेअर पर्सन रविंद्र गोलर म्हणाले, लिओ क्लबच्या माध्यमातून तरुणांना एकत्र केले जाते. या  माध्यमातून तरुणांना नेतृत्वाची संधी मिळते. तरुणांना देशाच्या भविष्यासाठी सज्ज करण्यासाठी लिओ क्लब काम करणार आहेत. कोरोना काळात रस्त्यावरील गरजूंना ब्लँकेट वाटप, वृक्षारोपण, शिधा वाटप यांसारखी विविध कामे लिओ क्लबच्या सदस्यांनी यापूर्वी केली आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading