Saturday, May 30, 2026
PUNE

पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असो. च्या दैनंदिनीचे अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन

पुणे : पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स् असोसिएशनच्या सन २०२१ सालाच्या दैनंदिनीचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुभाष मोहिते, उपाध्यक्ष अ‍ॅड. साहेबराव टकले, मानद सचिव संगीता कांकरीया, संचालक सुनील रुकारी, विजय ढेरे, निलेश ढेरे, तुकाराम गुजर, बाळासाहेब उंद्रे, रमेश वाणी,  प्रिया महिंद्र व मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर जेरे उपस्थित होते. 
असोसिएशनच्या दैनंदिनी मध्ये सहकारी बँका त्याच्या संचालक अधिकारी यांना गरजेची अत्यावश्यक माहिती ही सविस्तरपणे देण्यात आली आहे. त्यामुळे  डायरी ही संग्राह्य व टेबल डायरी म्हणून निश्चितपणे उपयोगी पडेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. सदर डायरीला बँका व सहकारी कार्यकर्ते यांच्याकडून प्रचंड मागणी आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading