Saturday, May 30, 2026
MAHARASHTRAPUNETOP NEWS

अखेर ‘संभाजी बिडी’ चे नाव बदलले…!

पुणे, दि. 20 – छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने विकली जाणारी बिडी आता ‘साबळे बिडी’ या नावाने विक्री होणार. ‘संभाजी ब्रिगेड’ च्या अनेक वर्षाच्या लढ्याला अखेर यश मिळाले आहे. अशी माहिती संभाजी ब्रिगेड चे संघटक संतोष शिंदे यांनी दिली.

कोल्हापूर येथे दि. 20 ऑगस्ट २०२० रोजी संभाजी ब्रिगेडचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मा. रुपेश पाटील – 9096614646 यांच्या नेतृत्वाखाली संभाजी बिडी ची गाडी पकडली आणि ज्या ज्या ठिकाणी विक्री केली जात होता त्या व्यापाऱ्यांना संभाजी ब्रिगेडने ठणकावून विरोध करण्यास भाग पाडले. व्यापाऱ्यांनी सुद्धा विक्री करण्यास बंद केले व सुमारे २० लाख रुपयाचा जुना माल कोल्हापुरातील व्यापाऱ्यांनी साबळे-वाघेरे कंपनीला परत पाठवला. त्यानंतर दि. 10 सप्टेंबर 2020 रोजी साबळे कंपनीने संभाजी ब्रिगेड’ च्या दबावाखाली अधिकृत पत्रकार परिषद घेऊन नाव बदलणार हे जाहीर केले.

पुण्यात सुद्धा 2010 मध्ये साबळे-वाघिरे कंपनीला संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही कार्यालयात जाऊन निवेदन दिले होते. त्यावेळी या आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे, नकुल भोइर, साहेबराव साळुंखे परमेश्वर जाधव, सतीश काळे, नारायण लोधे आदी कार्यकर्त्यांनी सुद्धा प्रचंड पाठपुरावा केला होता. वातावरण सतत धगधगत होते.

संभाजी ब्रिगेडच्या वतीने कोल्हापूरमध्ये जल्लोषात ‘रॅली’ काढण्यात आली. तर पुण्यात संभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्याच्या वतीने साबळे-वाघीरे कंपनीचे मालक मा. राहूल साबळे यांचा छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांची प्रतिमा देऊन सन्मान केला व पेढे वाटून त्यांचे कौतुक केले. यावेळी श्री साबळे यांनी मा. पुरूषोत्‍तम खेडेकर साहेब व सौरभदादा खेडेकर यांच्याशी फोनवरून संवाद साधला.

इचलकरंजीत मागील पंधरा दिवसांपूर्वी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी परत गाड्या अडवल्या. कारण नाव संभाजी महाराजांचे असल्यामुळे ते कुठल्याही ‘शिवप्रेमी’ कार्यकर्त्याला सहन होत नव्हते. त्यामुळे साबळे वगैरे कंपनी द्या तात्काळ निर्णय घ्यावा लागला.

‘बिडी’ विरोधातील संपूर्ण आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अँड. मनोजदादा आखरे व महासचिव सौरभ दादा खेडेकर यांनी प्रत्येक कार्यकर्त्याला ‘बिडी’ बंद झाली पाहिजे यासाठी आदेश दिले होते. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. पुणे जिल्ह्यासह कोल्हापूर मधील सर्व कार्यकर्त्यांनी हे आंदोलन लावून धरले. यात सर्वात मोठे यश कोल्हापूरचे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील, अभिजीत कांजर, निलेश सुतार, विकी जाधव, अभिजित भोसले, भगवान कोईगडे, विक्रमसिंह घोरपडे, अमरसिंह पाटील, मदन परीट, उमेश जाधव आदी कार्यकर्त्यांनी प्रचंड संघर्ष करून आंदोलन यशस्वी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading