पुण्यातील ९४ टक्के महिलांच्या मते पुरुषांनी घरातील कामांमध्ये अधिक लक्ष द्यायला हवे
पुणे: महाराष्ट्रातील दर १० पैकी ६ महिलांना स्वयंपाकातील वेळ वाचवून तो वेळ आपल्या आवडीनिवडींच्या कामासाठी वापरणे आवडेल, असे महाराष्ट्रातील १० शहरांमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे. #IgnitingAspirations या सर्वेक्षणातून असेही स्पष्ट झाले की, ४० ते ४५ या वयोगटातील ६१ टक्के महिला त्यांचा बहुतांश वेळ घरातील कामे, विशेषत: स्वयंपाक आणि मुलांची काळजी घेणे यात घालवतात. खरे तर सर्वक्षणात सहभागी झालेल्या ६० टक्क्यांहून अधिक महिलांना फक्त गृहिणी न राहता त्यापलिकडे काहीतरी करायचं आहे. जेमिनी कुकिंग ऑईलच्या या सर्वेक्षणानुसार नाशिकमधील ८४ टक्के महिलांच्या मते स्वयंपाकात कमी वेळ घालवल्याने त्यांना वैयक्तिक आवडींना वेळ देता आला. नागपूरमधील ३१ टक्के महिलांनी असेच मत नोंदवले आहे.
कुटुंबाचे आरोग्य आणि पोषण याकडे लक्ष देणे सर्वात महत्त्वाचे आहे, यावर महिलांचा ठाम विश्वास आहे, असे या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले. सर्वेक्षणातील ६५ टक्के महिलांना वाटते की, त्यांनी बनवलेले अन्न अधिक सुरक्षित आणि आरोग्यदायी असते. मात्र, आपल्या महत्त्वाकांक्षा जोपासण्यासाठी त्यांना घरगुती कामांमध्ये जाणारा वेळ कमी करायचा आहे. आपली आवड जोपासायची आहे, असे महाराष्ट्रातील ६० टक्के महिलांनी सांगितले. नाशिक, सोलापूर आणि पुणे ही तीन शहरे यात आघाडीवर आहेत. या शहरातील महिलांना रोजच्या घरगुती कामांतून ३० मिनिटे जरी अधिक मिळाली तरी स्वत:ची आवड जपायची आहे. आपली आवड जपण्यासाठी ३७ टक्के महिलांना कुटुंबियांकडून अधिक पाठिंबा आणि प्रोत्साहनाची अपेक्षा आहे, असेही या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे.
महत्त्वाचे निष्कर्ष :
· ८० टक्के महिला बहुतांश स्वयंपाक स्वत:च करतात, कारण हा पर्याय आरोग्यदायी आहे आणि सध्या मदतनीसही नाहीत
· महिलांच्या सर्वेक्षणानुसार स्वयंपाक (दिवसाला १०० मिनिटे) आणि मुलांचा सांभाळ (दिवसाला १३३ मिनिटे) ही सर्वाधिक गुंतवून ठेवणारी कामे आहेत, त्यानंतर स्वच्छता आणि वाणसामानाची खरेदी
· ९७ टक्के महिलांनी सांगितले की, सणासुदीत कामे वाढतात कारण तेव्हा साफसफाई आणि स्वयंपाक अधिक असतो, त्यामुळे त्यांना स्वत:साठी आणखीनच कमी वेळ मिळतो
· द्वितीय श्रेणी शहरातील महिला घरात लिंगसमानतेचा पुरस्कार करतात, पुरुषांनीही घरातील कामांमध्ये साह्य करावे, अशी त्यांची अपेक्षा असते
· तरुण पुरुष महिलांना घरगुती कामांमध्ये अधिक साह्य करतात, २१ ते २५ वयोगटातील ७४ टक्के महिलांना पुरुषांकडून साह्य मिळते, अगदी ठाणे (९९ टक्के), नवी मुंबई (९० टक्के), मुंबई (८२ टक्के) आणि पुणे (८० टक्के) अशा मोठ्या शहरांमध्येही
· १० पैकी ९ महिलांनी सांगितले की, घरगुती कामांमध्ये पुरुषांनीही समान वाटा उचलावा असे त्यांना वाटते. सर्वेक्षणातील तरुण महिलांमध्ये हा विचार सर्वाधिक दिसून आला. कोल्हापूर ९५ टक्के, पुणे आणि ठाणे ९४ टक्के आणि नाशिक आणि नागपूर ८९ टक्के
· महाराष्ट्रातील ६४ टक्के महिलांनी एकट्या असताना करिअर, आवड, छंद यासाठी वेळ दिला होता, लग्नानंतर कुटुंब (५४ टक्के) आणि मुले (५७ टक्के) या बाबींना त्यांचे प्राधान्य आहे
· ६० टक्के महिलांना आताही कुटुंबाने घरगुती कामांमध्ये साह्य (३० टक्के) आणि प्रोत्साहन (३७ टक्के) दिल्यास आपल्या महत्त्वाकांक्षांचा वेध घेणे आवडेल.
सर्वेक्षणाबद्दल :डिसेंबर २०२० करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील १० शहरांमधील १२०० प्रतिसादकर्त्यांच्या प्रतिक्रिया घेण्यात आला. यात पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, नागपूर, अमरावती, कोल्हापूर, सोलापूर आणि औरंगाबाद या शहरांचा समावेश होता. गृहिणींच्या आयुष्यावर घरगुती कामांचा कसा परिणाम होतो आणि त्यांच्या आवडी जोपासण्यासाठी त्यांना पाठिंब्याची कशी गरज आहे, यासंदर्भातील निष्कर्ष यातून मांडण्यात आले.
