Saturday, May 30, 2026
ENTERTAINMENTMAHARASHTRA

ज्येष्ठ अभिनेता प्रेम चोप्रा यांनी स्वातंत्र्य-पूर्व काळातील स्मृतींना दिला उजाळा

पुणे, दि. 20- फाळणी पूर्वीच्या खूप गोड आठवणी आहेत माझ्या. माझे कुटुंब लाहोरच्या बाहेर राहात असे. मला आठवते की आम्ही सर्व जण जवळच्याच अनारकली बाजारात जायचो आणि तिकडे चाट खायचो व पतंग घेऊन खेळायचो. माझी आई आमच्यासाठी छान छान चविष्ट पदार्थ बनवत असे. आम्ही सर्वजण एकत्र आनंदात राहायचो. फाळणीनंतर सर्वकाही बदललं, अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेता प्रेम चोप्रा यांनी स्वातंत्र्य-पूर्व काळातील लाहोर येथील स्मृतींना दिला उजाळा दिला.

ते म्हणाले, आमचे संयुक्त कुटुंब होते, माझ्या आजोबांना तीन मुले असल्याने त्यांनी एकाच इमारतीतील एक एक मजला तिन मुलांना दिला होता, जेणे करून सर्वांना नेहमी एकत्र राहता यावे. फाळणी नंतरचे चित्र खूप वेगळ होतं. ‘क्यों उत्थे दिल छोड आए’ ही मालिका मला पुन्हा माझ्या बालपणात घेऊन गेली. ते प्रोमो पाहून माझे मन आनंदाने आणि गतकाळाच्या आठवणींनी भरून गेले. माझ्यासारखेच अनेकजण असतील त्यांनाही या मालिकेद्वारे आपले जून दिवस पुन्हा अनुभवायला मिळतील. या मालिकेच्या संपूर्ण टीमला मी मनःपूर्वक शुभेच्छा देतो.

‘फाळणी’ हा शब्द आजही भारतीयांच्या मनात कडूगोड आठवणी जागवतो. यातूनच फाळणीचा काळ आपल्याला किती महागात पडला, याची कल्पना आपल्याला येते. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘क्यों उत्थे दिल छोड आए’ ही नवी मालिका 1947 च्या म्हणजेच फाळणीपूर्व भारतातील लाहोरच्या पार्श्वभूमीवर बेतलेली आहे. ही कहाणी तीन तरुणी- अमृत, वशमा आणि राधा यांच्याभोवती गुंफलेली आहे. या तीन अशा मुली आहेत, ज्यांनी त्यांच्या आसपासचे विश्व फाळणीमुळे कोसळत असतानाही त्यांनी आशावादी राहून स्वप्नं पाहिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading