fbpx
Wednesday, April 24, 2024
PUNE

दगडखाण कामगारांच्या घरांच्या मागणीस लोकजनशक्ती पार्टीचा पाठिंबा

पुणे : दगडखाणीत काम करणाऱ्या असंघटित कामगारांना गायरान जागेत घरे बांधण्यास जागा मिळावी, या मागणीस लोकजनशक्ती पार्टीने पाठिंबा दिला आहे. दगडखाण असंघटित खाण कामगार विकास परिषदेच्या वतीने घरांच्या मागणीसाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु आहे. लोक जनशक्ती पार्टी पुणे शहराध्यक्ष संजय आल्हाट यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी या आंदोलकांची भेट घेऊन लोक जनशक्ती पार्टी पदाधिकाऱ्यांनी दगडखाण कामगार विकास परिषदेचे अध्यक्ष अॅड. बस्तू रेगे यांना पाठिंब्याचे पत्र दिले. यावेळी अशोक कांबळे, के.सी. पवार, संजय चव्हाण, अप्पासाहेब पाटील इत्यादी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading