आबेदा इनामदार यांचा सत्कार
पुणे – क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले पुरस्कार ‘ मिळाल्याबद्दल महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार यांचा सत्कार एम.ए. रंगुनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट तर्फे करण्यात आला. यावेळी डॉ. लतीफ मगदूम, इरफान शेख, डॉ. अनीता फ्रांत्झ, हेमा जैन उपस्थित होते . क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार हा आबेदा इनामदार यांना राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त लाल महाल येथे झालेल्या सोहळ्यात मिळाला होता.
