fbpx
Thursday, April 25, 2024
MAHARASHTRATOP NEWS

आदर्श गाव हिवरेबाजार निवडणुकीत पोपटराव पवार पॅनलची सरशी

हिवरेबाजार दि. १८ – ‘आदर्श गाव हिवरेबाजार’ येथे ३० वर्षांत पहिल्यांदाच निवडणुक झाली. या निवडणुकीत पोपटराव पवार यांच्या पॅनलचा सातही जागांवर विजय झाला आहे. हिवरेबाजार ग्रामपंचायतीत पोपटराव पवार यांची एकहाती सत्ता आली आहे. येथील बिनविरोध निवडणुकीची परंपरा यंदा प्रथमच खंडित झाली.

 लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद निवडणुक असो वा यंदाची ग्रामपंचायतीची निवडणूक असो या गावात कधीच कोणत्या पक्षाचे बूथ लागले नाही किंवा पोलिंग एजन्ट नव्हते.  देशातील हे दुर्मीळ उदाहरण असून गावकऱ्यांना प्रथमच निवडणुकीला सामोरे जावे लागले आहे. मतदानाच्या दिवशी मतदारांनी सकाळपासूनच यासाठी रांगा लावल्या होत्या. यावेळी निवडणूक बिनविरोध होऊ शकली नसली, तरी निवडणूक कशी असावी, याचाही आदर्श घालून देण्याचा आम्ही प्रयत्न करीत असल्याचे पोपटराव पवार यांनी सांगितले होते.गावातील किशोर संबळे यांनी पुढाकार घेऊन पोपटराव पवार यांच्याविरोधात पॅनल उभा केल्याने येथील निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही. त्यामुळे यावेळी मतदान झाले. ग्रामस्थांनी उत्साहात त्यामध्ये भाग घेतला. अन्य निवडणुका सोडल्या, तर ‘ईव्हीएम’ आल्यानंतर झालेली ही पहिलीच ग्रामपंचायत निवडणूक ठरली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading