लसीकरणानंतरही मास्क घालणे गराजे- पंतप्रधान नरेंद्र मोदी
जगातील सर्वात मोठया लसीकरण अभियानाला देशभरात सुरूवात
नवी दिल्ली, 16 जानेवारी – भारतात आज करोना लसीकरण अभियाला सुरूवात होत आहे. हा एक ऐतिहासिक दिवस असून देशातील सर्व वैज्ञानिकांचं मी अभिनंदन करतो. या लसीचे दोन डोस घेणे गराजेचे असून लासिकरणानंतरही मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्स पाळणे गराजे आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
आज 16 जानेवारी रोजी जगातील सर्वात मोठे लसीकरण अभियान सुरू झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी 10.30 वाजता व्हिडीओ प्रेस कॉन्फरन्सिंगद्वारे लसीकरण अभियानाची सुरुवात केली. यावेळी पंतप्रधानांनी करोंना योद्ध्यांनचे आभार मानले. तर या करोंना काळात करोंना योद्ध्यांनी केलेल्या अभूतपूर्व कामाच्या आठवणीने पंतप्रधान भाऊक झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, कोरोना वॅक्सिनचे 2 डोस घेणं महत्त्वाचं आहे. पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये जवळपास एक महिन्याचं अंतर ठेवणं आवश्यक आहे. दुसरा डोस घेतल्यानंतर 2 आठवड्यांनी तुमच्या शरीरात कोरोनाविरोधात आवश्यक शक्ती विकसित होईल. त्यामुळे पहिल्या लसीनंतर मास्क न घालण्याची चूक करू नका. कारण दुसऱ्या लसीनंतर इम्युनिटी विकसित होते. म्हणून मास्क घालून सोशल डिस्टंन्सिंग पाळण्याचं आवाहन मोदींनी देशवासियांना केले आहे.
संपूर्ण देश आजच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहात होता. कित्येक महिन्यांपासून देशातील प्रत्येक घरात लहान मुलं, वृद्ध, तरुण सर्वच जण कोरोना वॅक्सिन कधी येणार हाच प्रश्न विचारत आहेत. आता अतिशय कमी वेळात, लस आली आहे.आज वॅक्सिन रिसर्चशी जोडलेले अनेक लोक, वैज्ञानिकांचं विशेष कौतुक आहे. जे गेल्या कित्येक महिन्यांपासून कोरोनाविरोधात लस बनवण्यासाठी जुडले आहेत. साधारणपणे, एक वॅक्सिन बनवण्यासाठी अनेक वर्षांचा काळ जातो, मात्र आपल्या वैज्ञानिकांच्या प्रयत्नांनी एक नाही, तर दोन मेड इन इंडिया वॅक्सिन तयार झाल्या आहेत. आपले वैज्ञानिक आणि विशेषज्ञ ज्यावेळी दोन्ही मेड इन इंडिया वॅक्सिन सुरक्षित आणि प्रभावी असल्याबाबत आश्वस्त झाले, त्यावेळीच या वॅक्सिनला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे देशवासियांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये, असेही आवाहन त्यांनी केले.
