होंडातर्फे भारतात 2021 आफ्रिका ट्विन अडव्हेंचर स्पोर्ट्स लाँच

नवी दिल्ली – साहसी मोटरसायकल प्रेमींचा उत्साह वाढवण्यासाठी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. कंपनीने आज भारतात नव्या 2021 आफ्रिका ट्विन अडव्हेंचर स्पोर्ट्सची नोंदणी सुरू करत असल्याची घोषणा केली. 2021- वर्षाचे मेल डीसीटी आणि मॅन्युअल ट्रान्समिशन या दोन्ही प्रकारांत नव्या रंगात उपलब्ध केले जाणार आहे.

आफ्रिका ट्विनच्या वारशाविषयी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अत्सुशी ओगाता म्हणाले, आफ्रिका ट्विन खऱ्या अर्थाने साहसी वृत्तीचे दर्शन घडवणारी असून त्यामुळे तिने जगभरात कित्येक चाहत्यांची मने जिंकली आहेत. आफ्रिका ट्विन अडव्हेंचर स्पोर्ट्सचे 2021 इयर मॉडेल भारतात लाँच करून नव्या वर्षाची सुरुवात करताना होंडा टुव्हीलर्सला अतिशय अभइमान वाटत आहे. आता सुरुवात होईल, #ट्रुअडव्हेंचरची.

2021 आफ्रिका ट्विन अडव्हेंचर स्पोर्ट्सची नोंदणी सुरू झाल्याची घोषणा करताना होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि.च्या विक्री आणि विपणन विभागाचे संचालक श्री. यदविंदर सिंग गुलेरिया म्हणाले, ‘’गो एनीव्हेयर वृत्तीचा वारसा लाभलेली आफ्रिका ट्विन ही वीकेंड आणि ऑल टेरेन टुअरर्समधे (आठवड्याच्या अखेरीस तसेच सर्व प्रदेशांत फिरणाऱ्यांमधे) सर्वात लोकप्रिय असलेल गाडी आहे. भारतात आफअरिका ट्विनचा वंश यशस्वीपणे विस्तारत असून 2021 आफ्रिका ट्विन अडव्हेंचर स्पोर्ट्सची नवी आवृत्ती लाँच झाल्यामुळे साहसप्रेमींचा नवनव्या ठिकाणांना भेट देण्याचा उत्साह आणखी वाढेल.

Leave a Reply

%d bloggers like this: