‘अस्सं माहेर नको गं बाई’ या मालिकेमध्ये होणार गंडावरे बाबांचं आगमन!

समीर चौगुले हे नाव महाराष्ट्राच्या घराघरांत सगळ्यांना माहीत आहे. समीर आपल्या विनोदी अभिनयानं आणि कमाल टाइमिंगनं सगळ्यांचा लाडका झाला आहे. समीर आता प्रेक्षकांना एका नवीन भूमिकेत दिसणार आहे आणि ती भूमिका आहे गंडावरे बाबांची. सोनी मराठी वाहिनीवरल्या ‘अस्सं माहेर नको गं बाई’ या मालिकेतल्या उपासने कुटुंबाच्या घरी गंडावरे बाबांचंआगमन होणार आहे. मालिकेतली सखीची आई अनसूया ही गंडावरे बाबांची भक्त आहे. तिच्या बोलण्यात त्यांचा उल्लेख असतो आणि आता या गंडावरे बाबांचं मालिकेत आगमन होणार आहे. हे गंडावरे बाबा म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून तो आहे सर्वांचा लाडका समीर चौघुले! गंडावरे बाबा हे विनोदी पात्र असून याच्या मालिकेत 14 जानेवारीला आगमन होणार आहे, गंडावरे बाबांच्या येण्यानी मालिकेमध्ये आणि उपासनेंच्या घरी काय धमाल होते, ते जाणून घेण्यासाठी पाहा ‘अस्सं महेर नको गं बाई’, सोम.-शनि., रात्री 10 वा. फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

Leave a Reply

%d bloggers like this: