लसीकरणाची फक्त घोषणा नको तयारी करा – आबा बागुल

पुणे, दि. १३ – येत्या १६ जानेवारी पासून कोविड-१९ लसीकरणाचा शुभारंभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी सर्व लोकप्रतिनिधी तसेच सबंधित अधिकारी यांचे समवेत बैठक बोलवावी, अशी मागणी काँग्रेस पक्ष नेते आबा बागुल यांनी केली असून ‘फक्त घोषणा नको तयारी करा’, अशा सूचना प्रशासनास दिल्या आहेत. कोविड लस बाबत जनजागृती करणे आवश्यक असून याबरोबरच सद्यस्थितीत कोविड चे रुग्ण वाढत असल्याने यावरही लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचे आहे असेही बागुल यांनी सांगितले.

पुणे शहरात ६० हजार कोविडच्या लस आलेल्या असून शहरात १०० लसीकरण केंद्र करण्यात येणार आहेत. पुणे महानगरपालिका सुरुवातीला १६ कक्ष उभे करणार असून ६ केंद्र तातडीने चालू करणार आहे.  या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील कोविड लसीकरण केंद्र व या संदर्भातील पूर्व तयारी याची आज काँग्रेस पक्षाकडून जागा पाहणी करण्यात आली.

 काँग्रेस पक्ष नेते आबा बागुल, नगरसेवक रविंद्र धंगेकर, नगरसेवक रफिक शेख,  नगरसेविका सुजाता शेट्टी, नगरसेविका वैशाली मराठे, स्थायी समितीच्या सदस्य लता राजगुरू यांनी आज आरोग्य प्रमुख डॉ. भारती, सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ वैशाली जाधव यांच्या समवेत पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात पाहणी केली असता याठिकाणी प्रशासनाची कोविड लस देण्याची पूर्वतयारी नसल्याचे दिसून आले. परंतु २४ तास पूर्वी कल्पना देऊनही कमला नेहरू रुग्णालयात अस्वच्छता असल्याचे दिसून आले, ही अत्यंत गंभीर बाब समोर आली. तसेच ससून सर्वोपचार रुग्णालयाचे डीन डॉ. मुरलीधर तांबे, ससून मधील अधिकारी डॉ.तावरे यांच्या समवेत कोविड लसीकरण केंद्र व या संदर्भातील पूर्व तयारी बाबत ससून रुग्णालयात भेट घेतली असता लसीकरण केंद्र तयारी चालू असून लवकरच लस देण्याचा शुभारंभ होईल असे दिसले. त्यासंदर्भात असलेला स्टाफ यांचेशी चर्चा केली असता स्टाफ देखील पूर्ण तयारीत असून लस देण्यासाठी सज्ज आहोत असे सांगण्यात आले. त्यानंतर रुबी हॉस्पिटलमध्ये भेट दिली असता त्याठिकाणी लसीकरण केंद्राचे कक्ष पाहणी करण्यात आली. याठिकाणी कॅन्सर कक्षाच्या सुरुवातीच्या लॉबी मध्ये लसीकरण केंद्र केले असून सदर कक्ष पूर्णपणे वेगळा करावा अशा सूचना प्रशासनास बागुल यांनी दिल्या.

Leave a Reply

%d bloggers like this: