मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त उपक्रमांचे आयोजन
पुणे, दि. १२ – महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या मराठी अकादमीतर्फे १२ ते १५ जानेवारी दरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्याचा प्रारंभ मंगळवारी आझम कॅम्पस येथे झाला .शिक्षक ,शिक्षकेतर गटासाठी ऑनलाईन काव्यवाचन स्पर्धा ,विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा ,’ऑनलाईन -ऑफलाईन शिक्षण ‘ या विषयावर परिसंवाद अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे . संस्थेचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार ,अकादमीच्या प्रमुख नूरजहाँ शेख यांनी ही माहिती दिली . १५ जानेवारी रोजी असेम्ब्ली हॉल येथे सांगता समारंभ असून २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनी स्पर्धकांना पारितोषिके दिली जाणार आहेत.