लिटिल फ्लावर इंग्लिश मीडियम स्कूल बहरले विद्यार्थ्यांनी


पिंपरी, दि. १२ –  कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या मार्च महिन्यापासून बंद असलेली शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीचे लिटल फ्लॉवर इंग्लिश मिडीयम स्कुल आणि भारतीय विद्यानिकेतन विद्यालय विद्यार्थ्यांनी पुन्हा बहरले आहे. प्रदीर्घ विश्रांतीनंतर विद्यार्थ्यांनी शाळेत पाऊल ठेवल्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांमध्ये उत्साह ओसंडून वाहत आहे. 

संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, उपाध्यक्ष प्रणव राव, तेजल कोळसे पाटील, मुख्याध्यापिका हर्षा बाठीया, मुख्याध्यापिका गीता येरूणकर, आशा घोरपडे, स्वाती तोडकर, नीलम पवार, प्रिया मेनन, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत केले. शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांचे शाळेत उत्साहात स्वागत करण्यात झाले. सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी, तसेच वर्ग खोल्या निर्जंतुकीकरण अशी खबरदारी घेण्यात येत आहे. विद्यार्थ्यांची पूर्ण प्राथमिक तपासणी (सॅनिटायझर, ऑक्सिजन लेव्हल, तापमान) करण्यात आली. मार्च महिन्यापासूनच्या लॉकडाऊननंतर प्रदीर्घ विश्रांतीनंतर विद्यार्थ्यांमध्ये नवचेतना, प्रेरणा जागृत करण्यासाठी श्रीमती मधु जगदीश यांच्या प्रेरणादायी व्याख्यानाद्वारे‌ विद्यार्थ्यांना ऑनलाइन मार्गदर्शन केले. या व्याख्यानाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गीता येरुणकर यांनी विद्यार्थ्यांना सद्यस्थितीत नेमकी काय काळजी घ्यावी, याविषयी मार्गदर्शन केले. शाळेत जागोजागी त्याविषयीचे फलकही लावण्यात आले आहेत. ज्या पालकांचे समंतीपत्र नाही, अशा विद्यार्थ्यांचे ऑफलाइन बरोबरच ऑनलाइन शिक्षणही सुरू ठेवण्यात आलेले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: