fbpx
Friday, April 19, 2024
BusinessPUNETECHNOLOGY

लेंडिंगकार्ट ‘एक्सएलआर ८’ व्यासपीठाच्या सादरीकरणाची घोषणा

पुणे, दि. ११ –  लेंडिंगकार्ट टेक्नॉलॉजीस प्रायव्हेट लिमिटेड या भारतातील आघाडीच्या फिनटेक कंपनीने आज त्यांच्या लेंडिंगकार्ट एक्सएलआर८ या बहुमाध्यम भागीदार व्यासपीठाच्या सादरीकरणाची घोषणा केली.  यामुळे भागीदारांना लेंडिंगकार्टच्या एमएसएमईच्या व्यापक संपर्काचा लाभ घेता येणार आहे. एमएसएमई आपल्या व्यवसायातील भांडवलासाठी ऑनलाइन ब्राऊझिंग करतात. लेंडिंगकार्ट  एक्सएलआर८  च्या एपीआय सुटमुळे या ऑनलाइन भागीदारांना आपल्या कर्ज स्थितीची माहिती त्यांच्या स्वत:च्या व्यासपीठावर देणे शक्य होणार आहे. तसेच एसएएएस व्यासपीठामुळे ऑफलाइन भागीदार आणि एजंट्सना एक थांबी पर्याय उपलब्ध होतो. त्यातून ते स्वत:ला निर्मिती, व्यवहार पूर्ण करण्यासाठी साह्य करू शकतात तसेच या व्यासपीठामुळे लेंडिंगकार्टच्या खास झीरो टच तंत्रज्ञानाचा लाभ घेता येतो. त्यामुळे कमीतकमी कागदपत्रे आणि संपर्कासाठी कोणत्याही ऑफलाइन माध्यमावर अवलंबून न राहिल्याने अर्जांची प्रक्रिया वेगवान होणार आहे.

लेंडिंगकार्ट एजंट्स, बाजारपेठा आणि विविध व्यासपीठांसोबत भागीदारी करून एमएसएमई क्षेत्रात उपलब्ध वित्त उत्पादने, तारण शुल्क, लवचिकता आणि योग्य दरातील पर्याय यासह व्यावसायिक गरजा आणि पद्धतींनुसार वैयक्तिक उत्पादने यासंदर्भात जागरुकता निर्माण केली जात आहे. आजघडीला एक्सएलआर८ मुळे एपीआय  आणि एसएएएस  व्यासपीठ उपलब्ध होते आणि त्यातून संपूर्ण माहिती, कागदपत्रे आणि आवश्यक केवायसी माहितीसह अर्ज प्रक्रिया सुरू केली जाते. तसेच यात कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास भागीदारांना त्वरित कळवले जाते त्यामुळे ते तातडीने त्यावर तोडगा काढू शकतील.

लेंडिंगकार्ट टेक्नॉलॉजिसचे सहसंस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक हर्षवर्धन लुनिया म्हणाले, डिजिटल माध्यमांतून एमएसएमईजसाठी उपलब्ध असलेल्या तारणमुक्त वित्त पर्यायांसाठी बहुमाध्यम सेवा निर्माण करण्यासाठी आणि त्यासंदर्भात जागरुकता आणण्यासाठी आमच्या भागीदारांसोबत असलेली लेंडिंगकार्टची भागीदारी आमच्यासाठी महत्त्वाची ठरली आहे. पाच वर्षांहून अधिक काळच्या या प्रयत्न आणि उपक्रमांमुळे न्यू नॉर्मल स्थितीत फार चांगला परिणाम साधला गेला आणि या प्रचंड क्षमता असलेल्या बाजारपेठेतील कर्ज उपलब्धतेतील दरी भरून काढण्यात आम्ही नवे मापदंड रचण्यात अग्रणी असणार आहोत. आमचे हे समान ध्येय गाठण्यात आमच्या भागीदारांसोबतच्या या दीर्घकालीन सहकार्याबद्दल आम्ही आभारी आहोत आणि यापुढेही तशी अपेक्षा ठेवतो.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading