Sunday, May 31, 2026
PUNE

अभय माटे, डॉ.दिलीप देवधर यांना श्री यशोधन गौरव सन्मान जाहीर

पुणे : समाजात उल्लेखनीय कार्य करणा-या अभय माटे, डॉ.दिलीप देवधर यांना यंदाचा श्री यशोधन गौरव सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. सदाशिव पेठेतील श्री यशोधन नागरी सहकारी पतसंस्था आणि चौफेर प्रतिष्ठानतर्फे बुधवार, दिनांक १३ जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे संक्रात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये हे सन्मान प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती संस्थेचे सचिव राहुल भाटे यांनी दिली. 

कार्यक्रमाला खासदार गिरीष बापट, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, कार्यवाह महेश करपे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने आदी उपस्थित राहणार आहेत. जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष अभय माटे आणि डॉ.दिलीप देवधर यांना केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राघवेंद्र मानकर यांचा सत्कार होणार आहे. 
राहुल भाटे म्हणाले, सन १९९५ सालापासून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. कार्यक्रमाचे यंदा २७ वे वर्ष आहे. एस.एच.एंटरप्राजेस व प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन निर्मीत सार ग्रुप प्रकाशित व-हाड निघालयं लंडनला हे नाटक देखील पुणेकरांसाठी आयोजित करण्यात आले आहे. कलाकार संदीप पाठक हे सादरीकरण करणार आहेत. संस्थेचे ज्ञानेश्वर पासलकर, अविनाश आपटे, राहुल भाटे, आशा क्षीरसागर, निरंजन गोळे, अभिजीत गाडगीळ, केतन जोगळेकर, प्रथमेश भिलारे, स्वानंद गोळे आदींनी कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतला आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading