Saturday, September 5, 2026
PUNE

जलतज्ज्ञ सुरेश खानापूरकर यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार

सोशल रिस्पॉन्सिबीलिटी आणि महा एनजीओ फेडरेशनतर्फे आयोजन
पुणे : राष्ट्रमाता जिजाऊ जयंती, स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने सोशल रिस्पॉन्सिबीलीटी आणि महा एनजीओ फेडरेशनतर्फे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींना जीवनगौरव पुरस्कार, विवेकानंद पुरस्कार आणि जिजाऊ रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यंदा जलतज्ज्ञ सुरेश खानापूरकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा मंगळवार, दि. १२ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता नवी पेठेतील पत्रकार भवन येथे होणार आहे. 

कार्यक्रमाला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश पोलीस अधिकारी प्रेमा पाटील, महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा, सोशल रिस्पॉसिबीलिटीचे अध्यक्ष विजय वरूडकर, सुनील जोशी आदी उपस्थित राहणार आहेत. डॉ.अभिजीत सोनवणे, दिनकर कांबळे, नवनाथ जगताप यांचा विशेष सन्मान कार्यक्रमात करण्यात येणार आहे.
विवेकानंद पुरस्काराने मयूर बागुल, उमाकांत मीटकर, दामोदर रामदासी, विनायक रायकर, प्रल्हाद कुटे, आनंदा थोरात, अविनाश गोफणे या व्यक्तींना सन्मानित करण्यात येणार आहे. तर, जिजाऊ पुरस्काराने चंद्रकला भार्गव, अनिता झांबरे, मीना भोसले, नलिनी शेरकुरे, पुष्पलता डोके, हर्षाली चौधरी, यती राऊत यांना सन्मानित करण्यात येणार आहे.  मुकुंद शिंदे, अ‍ॅड.कान्होपात्रा गायकवाड, गणेश बाकले, जगदीश गजऋषी, राहुल पाटील, अमोल उंबरजे, केदार गजॠषी, शशांक ओंबासे आदींनी कार्यक्रमाच्या संयोजनात सहभाग घेतला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading