Saturday, May 30, 2026
PUNE

बंधुता चळवळीचा इतिहास ग्रंथरूपाने वाचकांच्या भेटीला

पुणे : बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या चार दशकाहून अधिक काळ चालू असलेल्या बंधुता चळवळीचा इतिहास ग्रंथरूपाने वाचकांच्या भेटीला येणार आहे. काषाय प्रकाशनाच्या पुढाकारातून ‘बंधुता आणि संघर्ष’ ग्रंथाचे येत्या २३ जानेवारी २०२१ रोजी प्रकाशन होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते हॉटेल सुकांता, डेक्कन जिमखाना, पुणे येथे हा प्रकाशन सोहळा होणार आहे.

गेल्या चार दशकाहुन अधिक काळ सुरु असलेला बंधुतेचा हा प्रवास डॉ. नयनचंद्र सरस्वते यांनी ‘बंधुता आणि संघर्ष’ या ग्रंथात मांडला आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या संविधानिक मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी केलेल्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमाची सविस्तर माहितीही यात आहे. राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी विविध संस्थांच्या सहकार्याने घेतलेल्या सात विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलनाची, बारा विविध महापुरुषांच्या जीवनकार्यावर घेतलेल्या विचारवेध संमेलनांची आणि अखंडितपणे घेतलेल्या २२ राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनांची माहिती त्यामध्ये दिलेली आहे.


काषाय प्रकाशनच्या या उपक्रमासाठी  ‘बंधुता आणि संघर्ष’ या नावे प्रसिद्ध साहित्यिक आणि विचारवंत डॉ. नयनचंद्र सरस्वते यांनी अभ्यासात्मक आणि संशोधनात्मक लेखन केलेले आहे. या ग्रंथाच्या प्रकाशनासोबतच विविध क्षेत्रातील १९ व्यक्तींना आणि सहा संस्थांना पाहुण्यांच्या हस्ते ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथमित्र पुरस्कारा’ने गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती प्रकाशक प्रा. चंद्रकांत वानखेडे यांनी दिली

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading