fbpx
Thursday, April 25, 2024
MAHARASHTRAPUNE

माझी वसुंधरा अभियानांतर्गत राज्यस्तरीय पर्यावरण शॉर्टफिल्म फेस्टीव्हल उद्यापासून पुण्यात

पुणे, दि. १० – माय अर्थ फाउंडेशन आणि सहयोगी संस्थांच्या मार्फत जागतिक युवा दिनानिमित्त माझी वसुंधरा अभियानांतर्गत राज्यस्तरीय पर्यावरण शॉर्टफिल्म फेस्टिव्हल आजपासून पुण्यात सुरु होत आहे. स्वच्छता, जैवविविधता, कचरा विलगीकरण, अर्बन फॉरेस्ट, नदी पुनरुज्जीवन अशा विविध विषयांवरील लघुपटांचा या महोत्सवात समावेश आहे.  

सोमवार, दि. 11 जानेवारी रोजी म्हात्रे पुलानजिक असलेल्या तेंडुलकर उद्यानाशेजारील इंद्रधनु हॉल येथे सकाळी ११.३० ते ४.०० यावेळेत पहायला मिळतील. तसेच यातील निवडक २० लघुपटाचे प्रक्षेपण व पारितोषिक वितरण समारंभ मंगळवार दि. १२ जानेवारी रोजी सायंकाळी ४.०० वा. स्व. बाळासाहेब ठाकरे कलादालन, सारसबागजवळ पुणे येथे होणार आहे. यावेळी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले, इन्व्हारमेंट क्लब ऑफ इंडियाचे निलेश इनामदार, लेखक व दिग्दर्शक नितीन सिंधुविजय सुपेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती माय अर्थ फाउंडेशनचे अध्यक्ष अनंत घरत यांनी दिली. हे फेस्टिवल पुणे महापालिकेच्या सहकार्याने, माय अर्थ फौंडेशन, सस्टेनाबिलीटी इनिशीएटीव्हज, एन्व्हार्मेंट क्ल्वब ऑफ इंडीया व ध्यास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले आहे.

यावेळी एन्व्हार्मेंट क्ल्वब ऑफ इंडीयाचे ललित राठी,  सस्टेनेबल इनिशिएटिव्हचे अमोल उंबरजे, ध्यास प्रतिष्ठानचे सोमनाथ पाटील यावेळी उपस्थित असणार आहेत.

हवामानातील बदलामुळे अनियमीत पाऊस, निसर्गसारखी वादळे अशी  संकटे निर्माण झालेली आहेत. त्यामुळे पर्यावरण रक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही म्हणूनच सर्वांच्या एकत्रित सहभागातून माझी वसुंधरा अभियान प्रभावीपणे राबवण्याचे आवाहन राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले होते, या आवाहनाला प्रतिसाद म्हणून या अभियानाला प्रबोधनात्मक जनजागृतीसाठी पर्यावरण विषयावरिल लघूपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading