fbpx
Thursday, April 25, 2024
PUNE

लोकबिरादरी मित्र मंडळ आयोजित शिबिरात ७० जणांचे रक्तदान

पुणे : लोकबिरादरी मित्रमंडळ ट्रस्ट पुणे, आयोजित रक्तदान शिबिरात एकूण ७० रक्तदात्यांनी रक्तदान केले, तर ३२ लोकांचे कोरोना अँटिबॉडीचे  चेकअप झाले. हे दोन दिवसीय शिबीर सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत किट्रॉनिक्स इंडिया कोथरूड येथे आयोजित करण्यात आले होते. लोकबिरादरी मित्रमंडळ ट्रस्ट पुणेच्या सभासदांसह, कुटूंबीय आणि मित्रपरिवारातील अनेकांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला, असे लोकबिरादरी मित्रमंडळ ट्रस्टच्या विश्वस्त ऐश्वर्या चपळगांवकर यांनी सांगितले. शिबिराच्या उद्घाटनावेळी रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्टचे राम बांगड यांनी रक्तदात्यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले.
रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्ट, आचार्य आनंदऋषीजी रक्तपेढी यांचे या शिबिरासाठी मौलिक सहकार्य लाभले आहे. सध्याच्या परिस्थितीत सर्वच रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची कमतरता जाणवू लागली आहे. या परिस्थितीची जाणीव ठेऊन आपली सामाजिक बांधिलकी जपत लोकबिरादरी मित्र मंडळाने हे रक्तदान शिबीर आयोजित केले. या शिबीरात सर्वासाठी सवलतीच्या दरात कोरोना अँटिबॉडी टेस्टींगची सुविधाही जनकल्याण रक्तपेढीतर्फे उपलब्ध करण्यात आली होती. शिबीरात सुरक्षित अंतर व निर्जंतुकीकरणाची योग्य ती काळजी घेतली गेली. शिबिराच्या यशस्वीततेसाठी शिल्पा तांबे, सचिव नितीन पवार, राजेंद्र धुमाळ आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading