fbpx
Friday, April 26, 2024
Business

एमएस धोनी आणि झिवा ही बापलेकीची जोडी, सहभागी होत आहे ओरिओ ब्रिगेडमध्ये

माँडेलीझ इंडियाच्या मार्केटिंग (बिस्किट्स) विभागाचे सहयोगी संचालक सुधांशु नागपाल या अभियानाबद्दल म्हणाले, “देशातील सर्वाधिक लोकप्रिय ब्रॅण्ड्सपैकी एक म्हणून ओरिओने नेहमीच ग्राहकांच्या आयुष्यात खेळकरपणाची चमक आणण्यासाठी व नाती जोडण्यास प्रेरणा देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मात्र, सध्याच्या काळात व्यक्तिगत व व्यावसायिक आयुष्यातील सीमारेषा धूसर झालेल्या असताना, कुटुंबासोबत जोडून घेण्याचे क्षण अधिक महत्त्वाचे झाले आहेत. म्हणूनच या खडतर वर्षाला निरोप देऊन मोठी आशा घेऊन २०२१ सालात प्रवेश करताना आम्ही जानेवारी महिन्यात #OreoPlayPledge हे नवीन अभियान सुरू करत आहोत. एकंदर वातावरणात सकारात्मकता निर्माण करण्याचा व आपल्या ग्राहकांना आगामी काळात आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत खेळकरपणे जोडून घेण्यास प्रेरणा देण्याचा प्रयत्न ओरिओ या अभियानाच्या माध्यमातून करत आहे. आम्ही एमएस धोनी आणि झिवा यांना या अभियानासाठी ओरिओ ब्रॅण्ड अँबॅसेडर्स म्हणून आणत आहोत. त्यांच्या प्रेमळ तसेच खेळकर नात्यामुळे, ओरिओचे अभियान जिवंत होईल आणि ओरिओच्या खेळकर वायद्यांमध्ये सहभागी होण्याची प्रेरणा आमच्या ग्राहकांना मिळेल, असा विश्वास आम्हाला वाटतो.”

एमएस धोनी त्याचा अनुभव सांगतो, “झिवासोबत प्रथमच शूटिंग करणे हा माझ्यासाठी आनंददायी अनुभव होता. आमच्यातील खेळकर क्षण ओरिओ या आमच्या आवडत्या कुकीच्या सोबतीने पडद्यावर सर्वांसमोर आणणे मजेशीर होते. #OreoPlayPledge या नवीन अभियानाच्या निमित्ताने मला आणि झिवाला सेटवर छान वेळ घालवता आला. या अभियानाचा संदेश फारच सुंदर आहे. तुमच्या कुटुंबाशी खेळकरपणे जोडून घेण्यासाठी काही वेळ काढण्याचा वायदा करण्याची प्रेरणा हे अभियान तुम्हाला देते. मी एक वडील म्हणून व्यक्तिगत स्तरावर या आव्हानाला तोंड दिले आहे आणि खेळकरपणाच्या शक्तीतून सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या एका प्रक्रियेशी जोडले जाण्याची भावना खूपच छान आहे.”

या नवीन टीव्हीसीची संकल्पना पब्लिसिसने माँडेलीझ इंडियासाठी केली आहे. यामध्ये एका प्रसन्न रविवारच्या सकाळी एमएस धोनी व झिवा धोनी झिवाच्या आईसाठी केक बेक करत आहेत. मात्र, या कामात एक ट्विस्ट आहे! त्यांचा केक सजवण्यासाठी ठेवल्या जाणाऱ्या प्रत्येक ओरिओ कुकीसोबत ते एकमेकांसोबत अधिक वेळ घालवण्याचा वायदा करत आहेत. धोनी आणि झिवा यांच्यातील या मजेशीर आणि अवखळ संभाषणाची सांगता एका गोड ‘ट्विस्ट, लिक, डंक’ क्षणाने होते आणि ‘आपण जेवढे खेळकर राहू, तेवढे अधिक एकमेकांशी जोडले जाऊ’ या विचाराचा पुनरुच्चारही येथे होतो. लोकांना आपल्या खेळकर शपथा www.OreoPlayPledge.com वर शेअर करण्याची प्रेरणाही दिली जाते.

लॉकडाउनचा उदासवाणा काळ आणि या काळात भेडसावणाऱ्या चिंतेमुळे आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत जोडून घेणे अधिक महत्त्वाचे कसे झाले आहे हे लिओ बर्नेटच्या भारत विभागाचे व्यवस्थापकीय संचालक व दक्षिण आशियाचे चीफ क्रिएटिव ऑफिसर राजदीपक दास तसेच डिजिटाज इंडियाचे कार्यकारी उपाध्यक्ष व क्रिएटिव विभागाचे प्रमुख मार्क मॅकडोनाल्‍ड स्पष्ट करतात. “खेळ ही एकमेकांशी संवाद साधण्याची वैश्विक भाषा आहे. तेव्हा या नवीन वर्षात प्रवेश करत असताना, आमचे अभियान प्रत्येकाला ओरिओसोबत ‘प्ले प्लेज’ घेण्यास प्रोत्साहन देते,” असे राजदीपक सांगतात. मार्क पुढे म्हणतात, “आमच्या ग्राहकांना त्यांच्या मुलांसोबत मजेशीर क्षण निर्माण करण्याचे व त्या क्षणांचा आनंद लुटण्याचे वचन देण्यास प्रेरित करणारे संभाषण आम्हाला सुरू ठेवायचे आहे. आणि एमएस धोनी व त्यांची मुलगी झिवा हे हा संदेश जिवंत करण्यासाठी चपखल अँबॅसेडर्स आहेत, असा विश्वास आम्हाला वाटतो.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading