शांताई संस्थेच्या माध्यमातून समाज हिताचे कार्य सुरू – अभय छाजेड यांचे मत
पुणे – महिलांसह बहुजनांच्या उत्कर्षासाठी “शांताई “संस्थेच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य सुरू असून, सामाजिक बांधीलकी जपणारे आदर्श संस्था म्हणून शांताई चा गौरव करावा लागेल असे मत प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष अभय छाजेड यांनी व्यक्त केले. भीमा कोरेगाव शौर्य दिन व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी येरवडा नवी खडकी गावातील आदर्श व्यक्तिमत्व,काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी शिक्षण मंडळ अध्यक्ष अरुणभाऊ वाघमारे यांचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला. तसेच संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच सैनीटायझर प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थी यांचा गौरव करण्यात आला.
“शांताई” संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब कांबळे यांनी प्रास्ताविकात संस्थेची माहिती दिली. संस्थेला सातत्याने मदत करणारे येरवडा परिसरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवराय नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष अरुणभाऊ वाघमारे यांचा षष्ठ्यब्दीपूर्ती निमित्त मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला. संस्थेचे ज्येष्ठ संचालक एड. संपतराव कांबळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.मानसी जाधव, मेघ घोलप, अमोल राजगुरू,निलेश नेहरे, राजेंद्र काटे, रमेश सकट, नागेश भालेराव,शंकर राठोड, वसंत बराटे, राजाराम देवकर, डॉ. वज्रकांत कोरीशेट्टी, सुहास राजगुरु, प्रकाश बर्गे, इकबाल सय्यद,दिनकर मोहिते,जितेश खरात उपस्थित होते. यावेळी शिवराय नागरी पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. सूत्रसंचालन संचालिका रश्मीताई शागिरल यांनी केले तर आभार सिद्धार्थ कांबळे यांनी मानले. यावेळी शांताई संस्थेचे तसेच शिवराय नागरी पतसंस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
