बँक ऑफ बडोदातर्फे ग्राहकांसाठी व्हॉट्स अप बँकिंग सुविधा लाँच
मुंबई – सार्वजनिक बँकिंग क्षेत्रातील प्रवर्तक बँक असलेल्या बँक ऑफ बडोदा या देशातील तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या सार्वजनिक बँकेने व्हॉट्स अप या मेसेजिंग अपवर बँक सेवा लाँच करत असल्याचे जाहीर केले आहे. व्हॉट्स अपवर बँकेद्वारे उर्वरित रकमेची चौकशी, मिनी स्टेटमेंट, धनादेशाच्या अद्यावत स्थितीविषयी चौकशी, डेबिट कार्ड ब्लॉक करणे, बँकेची उत्पादने व सेवांची माहिती, डिजिटल उत्पादनांसाठी नोंदणी/अर्ज इत्यादी सेवा दिल्या जाणार आहेत.
या उपक्रमामुळे ग्राहकांना आपल्या घरीच राहून आरामात सेवा वापरता येईल व बँकेचे डिजिटल अस्तित्व विस्तारण्यास मदत होईल. या सेवेशी संबंधित महत्त्वाच्या फायद्यांमधे बँकिंग सेवांची 24*7 उपलब्धी, अर्ज डाउनलोड करण्याची अतिरिक्त गरज नसणे, सर्व ग्राहकांसाठी सहज उपलब्धता आणि सोयीस्करपणा तसेच कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय आयफोन आणि अँड्रॉइडवर उपलब्धता इत्यादींचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, बँकेचे ग्राहक नसलेल्यांनाही या प्लॅटफॉर्मचा वापर करून बँकेची उत्पादने, सेवा, ऑफर्स, एटीएम आणि शाखांची ठिकाणे याविषयी विचारता येणार आहे. या सेवेची परिचितता आणि सोपेपणा यामुळे ग्राहकांना व्हॉट्स अपच्या माध्यमातून सफाईदारपणे बँकिंग सेवांचा लाभ घेता येणार आहे.
कार्यकारी संचालक श्री. ए. के. खुराना लाँचविषयी म्हणाले, ‘ग्राहकांना विनाअडथळा बँकिंग सेवा पुरवण्यावर बँकेने कायमच भर दिला आहे. अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करून सोप्या आणि नाविन्यपूर्ण सेवा देण्यासाठी आम्ही सातत्याने काम करत असतो. सोशल मीडियाचा वाढता प्रभाव लक्षात घेत व्हॉट्स अप बँकिंग ग्राहकांना त्यांच्या बँकेविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी अतिशय सोयीस्कर ठरेल असे आम्हाला वाटते.’
व्हॉट्स अप बँकिंग सेवेचा लाभ घेण्यासाठी पुढे दिलेल्या सूचनांचे पालन करा –
1. नोंदणी करा – तुमच्या मोबाइलच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधे बँकेचा व्हॉट्स अप बिझनेस अकाउंट क्रमांक 8433 888 777 सेव्ह करा.
2. मेसेज पाठवा – व्हॉट्स अपवरून या क्रमांकावर “HI” पाठवून संभाषण सुरू करा.
त्याशिवाय तुम्हाला पुढील लिंकवर क्लिक करून बँकेच्या व्हॉट्स अपवर थेट संपर्क करता येईल – https://wa.me/918433888777?text=Hi
अधिक माहितीसाठी भेट द्या www.bankofbaroda.in
