होंडा टुव्हीलर्स इंडियाच्या देशांतर्गत विक्रीमधे डिसेंबर 2020 महिन्यात 5 टक्के वाढ
गुरुग्राम, – अनपेक्षितव अभूतपूर्व 2020 ची सकारात्मक अखेर करत होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि ने डिसेंबर 2020 मधे झालेल्या विक्रीची घोषणा केली आहे.
सणासुदीच्या काळानंतरही चांगली मागणी मिळाल्याने होंडा टुव्हीलर्सची वार्षिक विक्री सलग पाचव्या महिन्यात म्हणजेच डिसेंबरमधेही चांगली राहिली. होंडाची देशांतर्गत विक्री वर्ष 2020 मधे पाच टक्क्यांनी वाढून 2,42,046 युनिट्सवर पोहोचली असून गेल्या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात असलेल्या 230,197 विक्रीशी तुलना करता यंदा त्यात वाढ झाली आहे. डिसेंबरमधील होंडाची एकूण विक्री डिसेंबर 2019 वरील 255,283 युनिट्सवरून 3 टक्क्यांनी वाढून 263,027 युनिट्सवर गेली आहे.
उल्लेखनीय गोष्ट म्हणजे आर्थिक वर्ष 2020- 21 ची तिसरी तिमाही आशा व सकारात्मकतेचं दर्शन देणारी होती. पहिल्या तिमाहीमधे व्यवसाय ठप्प झाला होता, तर दुसऱ्या तिमाहीमधे एकंदर यंत्रणा स्थिरस्थावर करण्यात आणि मागणी पुरवण्यात गेली. ऑक्टोबर ते डिसेंबर ही तिमाही मात्र होंडासाठी सकारात्मक वार्षिक विक्री देणारी पहिली तिमाही ठरली. होंडाची आर्थइक वर्ष 2021 च्या तिसऱ्या तिमाहीतील देशांतर्गत विक्री वार्षिक पातळीवर गेल्या वर्षाच्या याच कालावधीतील 10,91,299 युनिट्सवरून यंदा 11,49,101 युनिट्सवर गेली आहे.
बाजारपेठेतील वातावरणाविषयी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. च्या विक्री आणि विपणन विभागाचे संचालक यदविंदर सिंग गुलेरिया म्हणाले, ‘डिसेंबर 20 मधील सकारात्मक आणि घाऊक खरेदीनंतर आम्ही नव्या आशेने 2021 मधे प्रवेश करत आहोत. तिसरी तिमाही ही बऱ्याच काळानंतर सकारात्मक विक्री झालेली पहिली तिमाही ठरली. लो बेस इफेक्टमुळे पुढील दोन तिमाहीमधेही थोड्या प्रमाणात विकास दिसून येणार आहे, मात्र खरी सकारात्मक वाढ आणि बाजारपेठेचा विस्तार होण्यासाठी थोडा वेळ जावा लागेल. असे असले, तरी आम्ही सर्वजण 2021 साठी सज्ज झालो आहोत, कारण हे वर्ष होंडाचे भारतातील विसावे वर्ष आहे. वेगवेगळे नवे ब्रँड्स आणि आकर्षक ऑफर्स येऊ घातलेल्या असून होंडा सर्व प्रकारच्या चालकांना गाडी चालवणय्चा अनोखा आनंद मिळवून देण्यासाठी सज्ज झाली आहे.’
