Saturday, May 30, 2026
PUNE

भाजपा सहकार आघाडीच्या पुणे शहराध्यक्ष पदी सचिन दशरथ दांगट यांची निवड

 
पुणे दि. ५ – वारजे येथील भाजपाचे सक्रीय कार्यकर्ते तसेच स्वीकृत नगरसेवक सचिन दशरथ दांगट यांची भाजपा सहकार आघाडी च्या  पुणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे . पुणे शहर अध्यक्ष माजी आमदार जगदीश मुळीक यांनी नियुक्तीचे पत्र सचिन दांगट यांना दिले .यावेळी शहराध्यक्ष  संघटनमंत्री रवि अनासपुरे,  संघटन सरचिटणीस राजेश पांडे , सरचिटणीस गणेश घोष , दीपक पोटे , दीपक नागपुरे , प्रवक्ते धनंजय जाधव , विकास लवाटे ,दक्षिण भारतीय आघाडीचे राजेश पिल्ले उपस्थित होते .  गेली ५ वर्षे  सचिन दांगट हे पुणे पालिकेचे स्वीकृत सभासद म्हणुन काम करीत आहेत ..समाजोपयोगी आणि नाविन्यपुर्ण उपक्रम राबविणारा हाडाचा कार्यकर्ता म्हणुन सचिन दशरथ दांगट यांची ओळख आहे . यापुर्वी पुणे महानगरपालिका प्रभाग क्र ३२ चे भाजपाचे उमेदवार , सरचिटणीस खडकवासला विधानसभा मतदार संघ , स्वीकृत सभासद पुणे मनपा यांचेसह अनेक सामाजिक संस्थाचे पदाधिकारी म्हणुन त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे      

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading