अभिनेता संजय नार्वेकर दिसणार ‘मेरे साई’ मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत
अभिनेता तुषार दळवी ज्यात साई बाबांची प्रमुख भूमिका करत आहे, त्या सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील मेरे साई –श्रद्धा और सबुरी मालिकेत एका आगामी कथानकासाठी प्रख्यात मराठी अभिनेता संजय नार्वेकर दिसणार आहे.
संजय नार्वेकरने मराठी तसेच हिंदी चित्रपटांमधून तसेच नाटकांमध्ये आणि टीव्ही शोजमध्ये काम केले आहे आणि मराठी व्यावसायिक रंगभूमीवरचा तो एक लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. या मालिकेत संजय नार्वेकर ‘रामदास’ नावाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. रामदास एक सद्गृहस्थ आहे. त्याला आपल्या मुलीचे लग्न त्याला साई बाबांच्या आशीर्वादाने शिर्डीत लावून द्यायचे आहे.
या भूमिकेबद्दल टिप्पणी करताना संजय नार्वेकर म्हणाला, “मेरे साई मालिकेतल्या महत्त्वाच्या कथानकाचा भाग होताना मला खूप आनंद होत आहे. अशा महत्त्वाच्या आणि काळाशी सुसंगत मुद्द्यांना ही मालिका स्पर्श करते आणि प्रत्येक कथेमधून प्रेक्षकांना काही ना काही बोधपाठ मिळतो. मला वाटते की, मेरे साई ही प्रेक्षकांशी जास्तत जास्त संवाद साधणारी मालिका आहे, जी सकारात्मकतेचा प्रसार करते. मी जवळजवळ गेल्या तीन दशकांपासून चिटपट आणि नाटकांमध्ये काम करत आहे. मला टेलिव्हिजनवरील काही विशेष मालिकांमध्ये काम करायची इच्छा होती. त्यामुळे जेव्हा निर्मात्यांनी मला ह्या भूमिकेसाठी प्रस्ताव दिला, तेव्हा मी तो नाकारू शकलो नाही.”
