मातंग समाजाच्या आरक्षणासाठी दलित महासंघाचे आंदोलन
पुणे – मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे .अ. ब.क.ड. या प्रमाणे वर्गवारी करावी या प्रमुख मागणीसाठी दलित महासंघाच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात आले.
दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मच्छीद्र सकटे यांच्या आदेशावरून राज्यभर मातंग समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलने केली जात आहेत .पुण्यातील आंदोलनाचे नेतृत्त्व दलित महासंघाच्या राज्य उपाध्यक्ष लक्ष्मी पवार यांच्या नेतृत्त्वात झाले.यावेळी जिल्हाधिकारी यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले .या आंदोलनात खंडू भाऊ पवार ,लक्ष्मी ताई पवार उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य ,विद्याताई हांडे देशमुख अध्यक्ष दयासाम्राट फौंडेशन ,जयवंत जाधव ,वनिता कांबळे ,नेहा कांबळे,पिंकी जाधव,मंगेश पोकळे,मयुर पारगे यासह पुणे शहर व जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थीत होते.
