Sunday, May 31, 2026
Business

सोनालिका ने ९ महिन्यांमध्ये केली १ लाखाहून अधिक ट्रॅक्टर्सची विक्री

पुणे – मागील वर्षी २०२० मध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीप्रमाणेच, सोनालिका ट्रॅक्टर्सने नवीन वर्ष २०२१ ची सुरवात असामान्य अशा कामगिरीने केली आहे. एप्रिल ते डिसेंबर २०२० या केवळ ९ महिन्यांमध्ये एक लाखापेक्षा अधिक ट्रॅक्टर्सची विक्री करत सोनालिका या भारतातील सर्वाधिक वेगाने विस्तारणाऱ्या आणि भारतातून जगात निर्यात होणाऱ्या अव्वल उत्पादनाच्या ब्रँडने आपल्या दमदार कामगिरीचे प्रदर्शन केले आहे. सोनालिकाने ३३ टक्के व्यवसायवृद्धीचा दर गाठला असून तो उद्योगक्षेत्राच्या सरासरी १२ टक्के वाढीच्या तुलनेत तीन पटीने अधिक आहे तसेच कंपनीने आर्थिक वर्ष २० मधील एकूण विक्रीचा टप्पा आर्थिक वर्ष २१ च्या केवळ ९ महिन्यातच पार केला आहे. एकूण, कंपनीने डिसेंबर महिन्यातील उच्चांकी विक्रीचा टप्पा गाठत ११५४० ट्रॅक्टर्सची विक्री करून बाजारपेठेतील १६.१ टक्के वाटा उचलला आहे. 

सोनालिका ट्रॅक्टर्स कंपनी गेली सलग तीन वर्ष एक लाखाहून अधिक ट्रॅक्टर्सची विक्री दरवर्षाला करत आहे. यंदा, हा टप्पा केवळ ९ महिन्यातच गाठण्याची कामगिरी ही उल्लेखनीय आहे. कोव्हिड महामारीमुळे प्रभावित झालेल्या २०२० वर्षामध्ये सोनालिकाने ५ नवीन प्रिमियम ट्रॅक्टर बाजारात दाखल केले. टायगर, सिकंदर, डीएलएक्स, महाबली आणि छत्रपती आणि नुकत्याच सादर करण्यात आलेला टायगर इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचा त्यात समावेश आहे. भारतातील पहिला फिल्ड-रेडी इलेक्ट्रिक ट्रॅक्टर म्हणून ओळखला जाणारा टायगर इलेक्ट्रिक ट्रॅक्टर हा भारतातील सर्वाधिक परवडणारे चारचाकी इलेक्ट्रिक वाहन असेल. ही पाच अत्याधुनिक ट्रॅक्टर्स अद्ययावत तंत्रज्ञानाधारित आहेत आणि शेतकऱ्यांच्या पिकाच्या त्या-त्या भागाच्या विशिष्ट गरजा पूर्ण होतील अशा पद्धतीची रचना असलेले हे ट्रॅक्टर आहेत.

कंपनीच्या उल्लेखनीय कामगिरीविषयी बोलताना सोनालिका ग्रुपचे कार्यकारी संचालक रमण मित्तल म्हणाले,  केवळ ९ महिन्यातच आम्ही एक लाख ट्रॅक्टर्सची विक्री केली आहे. कंपनीने ३३.३ टक्के विकासदर साध्य केला असून तो उद्योगक्षेत्राच्या १२ टक्केच्या तुलनेत तीन पटीने अधिक आहे. त्याचबरोबर, आम्ही डिसेंबर महिन्यांमध्ये होणाऱ्या विक्रीचा उच्चांक गाठत ११५४० ट्रॅक्टर्सची विक्री केली असून बाजारातील आमचा वाटा १६.१ टक्के एवढा आहे. आम्ही आता आमचे उद्दिष्ट आणखी मोठे ठेवले असून दर सहा महिन्याला एक लाख ट्रॅक्टर्सची विक्री करण्याचे ध्येय आता आम्ही बाळगले आहे.


नावीन्यतेच्या आधारे ट्रॅक्टर उद्योगक्षेत्रात नवी मानके रचणाऱ्या सोनालिका ट्रॅक्टर्सने सर्वोत्कृष्ट उत्पादने बाजारात दाखल करीत शेतकऱ्यांच्या प्रगतीमध्ये योगदान दिले आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींची जाण आणि शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून सोनालिकाच्या टीमने अल्पावधीतच अनेक अव्वल उत्पादने बाजारात दाखल केली आहेत. आर्थिक वर्ष २१ मध्ये सर्वाधिक अर्धवार्षिक विक्रीचा टप्पा सोनालिकाने गाठला आहे. तसेच सर्वाधिक मासिक ट्रॅक्टर उत्पादन (१५२१८) आणि सर्वाधिक ट्रॅक्टर डिलिव्हरी (१९०००) आणि अंंमलबजावणीचा (१००१८) टप्पा आॅक्टोबर’२० मध्ये कंपनीने गाठला आहे. निर्यातक्षेत्रातही कंपनीने आपले स्थान भक्कम ठेवले असून निर्यात बाजारातील २६.६ टक्के वाटा उचलत २०२० मध्ये सर्वाधिक म्हणजे २.१ टक्के अधिक वाटा मिळविण्याचा मान कंपनीला मिळाला आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading