पुण्यातील कोहिनूर समूहाच्यावतीने अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी अडीच लाखांची देणगी
पुणे, दि. १ जानेवारी, २०२१ : बांधकाम व्यवसाय, औद्योगिक संकुलांची निर्मिती, विद्यार्थी वसतिगृहे आणि बांधकाम तंत्रज्ञान आदि क्षेत्रात कार्यरत असलेल्या कोहिनूर समूहाने अयोध्येत साकारत असलेल्या भव्य राम मंदिराच्या उभारणीसाठी अडीच लाख रुपयांची देणगी दिली आहे. कोहिनूर समूहाचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी दोन लाख एक्कावन्न हजार रुपयांचा धनादेश रामजन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष आचार्य किशोरजी व्यास यांच्याकडे सुपूर्त केला. या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण धबडगाव तसेच राम मंदिर निधी संकलन उपक्रमाचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख मिलिंद देशपांडे, पश्चिम महाराष्ट्र धर्मजागरण प्रमुख हेमंत हरहरे, निधी संकलन अभियान पुणे विभाग प्रमुख राजन गोरे आणि सतीश खिवंसरा आदि मान्यवर उपस्थित होते.
