राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांची केंद्रात बदली
मुंबई, – महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे राज्याच्या पोलीस महासंचालकपदासाठी अनेक नाव चर्चेत आली आहे. तसंच अनेक वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा निर्णयही ऐरणीवर आला आहे.
महाराष्ट्र पोलीस दलाच्या पोलीस महासंचालकपदी असलेले सुबोधकुमार जयस्वाल यांच्या नियुक्तीला आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे त्यांच्या जागी आता नवीन महासंचालक कोण येणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. नवीन वर्ष सुरू झाल्यावर 2 जानेवारीला नव्या नियुक्तीबाबत चर्चा अपेक्षित आहे. त्यामुळे पोलीस महासंचालकपदाच्या स्पर्धेत अनेक नावं समोर आली आहे. राज्य होमगार्ड डीजी पांडे हे 2022 ला निवृत्त होत आहेत. तर मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग हे सुद्धा 2022 मध्ये निवृत्त होणार आहे. त्यामुळे त्यांचे नाव चर्चेत आले आहे. तर हेमंत नगराळे हे ऑक्टोबर 2022 मध्ये निवृत्त होणार आहे. या तिन्ही अधिकाऱ्यांची नाव महासंचालकपदाच्या शर्यतीत आहे.
त्यांच्यापाठोपाठ बिपीन बिहारी यांचं ही नाव समोर आले आहे. बिपीन बिहारी हे जून 2021 मध्ये निवृत्त होणार आहे. त्यांच्यापाठोपाठ एस एन पांडे हे फेब्रुवारी 2021 म्हणजे दोन महिन्याने निवृत्त होणार आहे. त्यामुळे या दोन्ही अधिकाऱ्यांची नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. सुबोधकुमार जयस्वाल यांची केंद्रातील आद्योगित सुरक्षा दलाच्या महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. 30 सप्टेंबर 2022 पर्यंत त्यांचा कार्यकाळ असणार आहे.
