पहाटे ‘दुध’ पिऊन ३१ डिसेंबर साजरा
पुणे, दि. 31 – ‘सुप्रभात योगा व संभाजी ब्रिगेड’ धनकवडी, पुणे च्या वतिने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आज ’31 डिसेंबर ‘दूध’ पिऊन व योगा करून’ साजरा करण्यात आला.
Covide-19 च्या संकटामुळे संपूर्ण 2020 हे वर्ष अतिशय संकटाचे आणि दुःखात गेले. आरोग्याच्या प्रचंड समस्या निर्माण झाल्या. आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. ‘अंधश्रद्धा व कर्मकांडा’ पासून दूर राहिले पाहिजे. येणारे २०२१ हे वर्ष आरोग्यसंपन्न व समृद्धीचे जावो यासाठी २०२० वर्षाचा शेवट दारू पिऊन ‘झिंगाट’ न होता ‘दूध’ पिऊन ‘आरोग्यसंपन्न’ साजरा केला पाहिजे म्हणून… सुप्रभात योगा व संभाजी ब्रिगेड’ च्या वतीने सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी ‘आज पहाटे’ अनोखा उपक्रम राबवण्यात आला. लोक संध्याकाळी दारू पितात, आम्ही सकाळी ‘दूध’ पिऊन व योगा करून ३१ डिसेंबर साजरा केला.
कोरोना’वर सर्वांनी मात केली पाहिजे आणि प्रत्येकांनी आरोग्यसंपन्न राहिले पाहिजे यासाठी राज्य सरकार, पुणे महानगरपालिका व सर्व यंत्रणा प्रचंड प्रयत्न करत आहे. आपण ही सर्वांना सहकार्य केले पाहिजे आणि सरकारचे सर्व नियम पाळले पाहिजेत यासाठी एक नागरिक म्हणून आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. म्हणून संध्याकाळी नियम न मोडता आम्ही सकाळीच हा सामाजिक उपक्रम राबवला. अशा उपक्रमाचा सर्वांनी आदर्श घेतला पाहिजे.
यावेळी योगशिक्षक सुनील भालेराव, संभाजी ब्रिगेड’चे संतोष शिंदे, भिकाजी साळुंखे, स्वप्निल कोंडे, साळूंखे काकू, माधुरी शेडगे, सुरेखा तावरे, शालिनी शिंदे, वर्षा जराड, नलावडे काकू, कविता ढेरे, कुंभार सर, सई शिंदे, शिवाजी शिंदे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन शालिनी शिंदे यांनी केले तर आभार सुनील भालेराव सर यांनी मानले.
