Sunday, May 31, 2026
PUNETOP NEWS

PMPML खरेदी करणार 150 ई-बस

पुणे – केंद्र सरकारच्या फेम-२ योजनेअंतर्गत १२ मीटर ९०० एमएम फ्लोअर हाईट एसी विथ ऑटो ट्रान्समिशनयुक्त बीआरटी १५० ई-बसेस जीसीसी (ग्रोस कॉस्ट कॉन्टॅरक्ट-भाटेतत्त्वावर) तत्वावर पुणे महानगर परिवहन महामंडळ घेणार आहे, अशी माहिती खासदार गिरीष बापट आणि पीएमपीएमेलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र जगताप यांनी दिली.

पुणे महानगर परिवहन महामंडळाडून याबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ,स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, संचालक शंकर पवार व अन्य पीएमपीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. “इलेक्ट्रिक आणि हायब्रीड वाहन तंत्रज्ञानाच्या निर्मितीस प्रोत्साहन देणे आणि तिची शाश्वत वाढ सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाकडून फेम (Faster Adoption and Manufacturing of Electric Vehicles-I) ही योजना सुरू केली आहे. यासाठी महामंडळाने ६०० इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध होणेकरीता केंद्राकडे प्रस्ताव दाखल केला होता.

त्यानुसार दि. २० ऑगस्ट २०१९ रोजी १२ मीटर, एसी, विथ ऑटो ट्रान्समिशन, बीआरटी १५० इलेक्ट्रिक बस जीसीसी तत्वावर घेण्यास केंद्राची मान्यता प्राप्त मिळाली. यामध्ये प्रतिबसला रूपये ५५ लाख सबसिडी केंद्र शासनाकडून मिळणार आहे. या मान्यतेनुसार प्रशासनाने ०१ नोव्हेंबर २०१९ ते ३०डिसेंबर २०१९ कालावधीत जीईएम पोर्टलवर निविदा राबबिण्यात आली होती. परंतु, यावेळी किफायतशीर दर प्राप्त न झाल्याने निविदा प्रक्रिया महामंडळाकडून रद्द करण्यात येऊन निविदा रद्द बाबत डिपार्टमेंट ऑफ हेवी इंडस्ट्रीज, भारत सरकार यांना महामंडळाकडून कळविण्यात आले.

त्यानुसार नव्याने निविदा प्रक्रिया राबवून वर्कऑर्डर देण्यासाठी दि. ३१ डिसेंबर २०२० पर्यंत केंद्र शासनाकडून महामंडळास मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामुदतवाढीनुसार संचालक मंडळाने देखील नव्याने निविदा प्रक्रिया सुरू करण्यास मान्यता दिली. त्याप्रमाणे निविदा प्रक्रीया राबविण्यात आली. त्यानुसार पीएमपी आता 150 ई बसेस खरेदी करणार आहे. असे पीएमपीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र जगताप यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading