Saturday, May 30, 2026
ENTERTAINMENTPUNE

महाराष्ट्राज बेस्ट डान्सर स्पर्धेत विनर होण्याची पुण्याच्या आर्य साठी सुवर्णसंधी !

पुणे – महाराष्ट्राज बेस्ट डान्सर ह्या स्पर्धेमध्ये आपल्या नृत्यानी परीक्षक आणि प्रेक्षक यांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण करणारा स्पर्धक म्हणजे आर्य डोंगरे. आर्य हा मूळचा पुण्याचा आहे. लहानपणापासून त्याला नृत्याची आवड असल्यानं त्यानं स्वतःला नृत्यालाच वाहून घेतलं आहे. ओमकार शिंदे यांच्या ओम अकॅडेमी या नृत्यशाळेत इन्स्ट्रक्टर म्हणून आर्य काम करतो.

याआधी काही रियॅलिटी शोजमध्ये आर्यनं सहभाग घेतला होता, पण तो फार पुढे जाऊ शकला नाही. महाराष्ट्राज बेस्ट डान्सर ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्याला मिळालेली सुवर्णसंधी आहे, असं तो मानतो. त्याच्या आईलाही नृत्याची आवड असल्यानं  आर्यला आर्ईचा लहानपणापासून पाठिंबा  मिळाला आहे. एवढंच नाही तर आर्यनं आपल्या आईला नृत्यही  शिकवलं आणि एका स्पर्धेत सहभागी व्हायला लावलं होतं. खरं तर आई मुलांची गुरू असते, पण आर्य तिचा गुरू आहे, असं आर्यच्या आईचं म्हणणं आहे.

आधी टॉप १२ आणि मग टॉप १० अशी मजल मारत आर्यची महाराष्ट्राज बेस्ट डान्सर मधली घोडदौड यशस्वीरीत्या सुरू आहे. परीक्षकांनाही  त्याची  सादरीकरणं आवडत. नुकतंच अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या सोशल मिडिया वरून  फोक फ्युजन एपिसोडमध्ये सादर केलेल्या आर्यच्या नृत्याचं कौतुक केलं.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading