गृहनिर्माण संस्था मानीव अभिहस्तांतरणबाबत चर्चासत्राचे आयोजन
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या वतीने गृहनिर्माण संस्थांना मालमत्तेचे मानीव अभिहस्तांतरण प्राप्त होण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्यावतीने १ ते १५ जानेवारी दरम्यान विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या विशेष मोहिमे अंतर्गत गृहनिर्माण संस्था यांचे मानीव अभिहस्तांतरण संदर्भात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेचे एन.ए. अनपट, अॅड. अंजली कलंत्रे या चर्चासत्रात सहभागी होणार आहेत. बुधवार दिनांक ३० डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता नवी पेठेतील पत्रकार भवन येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्था विचारात घेता मालमत्तेचे मानीव अभिहस्तांतरण झालेल्या संस्थांची संख्या अत्यंत अल्प आहे . गृहनिर्माण संस्था आणि मानीव हस्तांतरण यांचे महत्व ,फायदे, शासकीय तरतुदी, पुनर्विकास यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे तसेच नागरिकांच्या शंकाचे, प्रश्नांचे निरसन करण्यात येणार आहे.
