fbpx
Friday, April 26, 2024
PUNE

PMPML ची 11 मार्गांवर शुक्रवारपासून जलद सेवा


पुणे, दि. 24 – पीएमपीच्या वतीने शहरातील 11 लांब पल्ल्याच्या मार्गावर मर्यादित थांबे असणारी जलद बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवार (25 डिसेंबर) पासून ही सेवा सुरू होणार आहे. या बसचे तिकीट दर नियमित बसप्रमाणेच राहणार आहेत.

मुंबईच्या लोकल रेल्वे आणि बेस्टच्या धर्तीवर जलद बस सेवा पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) वतीने सुरु करण्यात येणार आहे. या सर्व मार्गावर वातानुकूलीत ई-बसच्या माध्यमातून सेवा देण्यात येणार आहे. साध्या बसच्या दरातच ही सेवा उपलब्ध असणार आहे. यासाठी कुठलाही अतिरिक्त भार प्रवाशांवर पडणार नाही. ठराविक मार्गावरच जलद बस थांबणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा सुरु करण्यात आली आहे. पीएमपीच्या वतीने प्रमुख 11 मार्गांवर ही बस सेवा देण्यात येणार आहे. या सेवेला 25 डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. प्रवाशांना इच्छित स्थळी लवकर पोहचता यावे, यासाठी जलद सेवा सुरु करण्यात आली असल्याचे पीएमपी प्रशासनाने सांगितले. प्रवाशांचा वेळ वाचाविणे, निश्चित स्थळी प्रवाशांना लवकरच पोहोचविणे, बस सेवेचा वेग वाढविणे, असा उद्देश या सेवेमागे आहे.

लॉकडाउननंतर उत्पन्नात घट झाली आहे. तसेच प्रवासी संख्या वाढविण्यासाठी उद्देशाने विविध उपाय योजना करण्यात येत आहे. यापूर्वी शहरातील मध्यवर्ती भागात 5 रुपयांत 5 किलोमीटर अशी अटल सेवा, विमानळासाठी अभि सेवा सुरू करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पीएमपीपासून लांब असणार्‍या प्रवाशांना लक्ष करून या सेवा सुरू करण्यात येत आहेत.

  • मार्ग एकूण थांब जलद थांबे वारंवारता
  • कात्रज ते निगडी 59 13 45 मि.
  • निगडी ते पुणे स्थानक 47 13 45 मि.
  • निगडी ते केसनंद फाटा 58 15 50 मि.
  • निगडी ते हिंजवडी फेज 3 40 13 40 मि.
  • भेकराईनगर ते हिंजवडी फेज3 68 18 65 मि.
  • भेकराईनगर ते आळंदी 64 12 45 मि.
  • भेकराईनगर ते चिंचवडगाव 56 14 40 मि.
  • भेकराईनगर ते निगडी 83 18 40 मि.
  • भेकराईनगर ते निगडी (अ) 58 13 60 मि.
  • शेवाळवाडी ते निगडी 58 13 60 मि.
  • भेकराईनगर ते एनडीए गेट 57 13 40 मि.
  • भेकराईनगर ते कात्रज 33 07 25 मि.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading